Home जालना मन्नत फाउंडेशन सैलानी तर्फे जनता वि‌द्यालयात पायी पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार

मन्नत फाउंडेशन सैलानी तर्फे जनता वि‌द्यालयात पायी पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार

92
0

आशाताई बच्छाव

1000602131.jpg

मन्नत फाउंडेशन सैलानी तर्फे जनता वि‌द्यालयात पायी पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 02/08/2024

आज दि. ०१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता वि‌द्यालयामध्ये शे. फारूख शे- ममलुभाई मुजावर अध्यक्ष, सह‌कारी कार्यकारी सोसायटी पिंपळगांव सराईचे तसेच मन्नत फाउंडेशन सैलानी यांच्या हस्ते वारकऱ्यांचा पोशाख तसेच पुष्पमाला घालुन सत्कार करण्यात आला.
बोरगांव काकडे येथील वारकरी श्री रामदास जनार्धन खंडागळेगेल्या ५६ वर्षापासून तसेच माळशेंबा येथील वत्सलाबाई, किसन उगले हे वारकरी गेल्या १८ वर्षापासून दरवर्षी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. यावर्षी सुद्धा त्यांनी न थकता न थांबता वारी पूर्ण केलेली आहे. “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या” .या अभंगाप्रमाने पांडुरंगाला क्षणभर डोळ्यामध्ये साठवण्यासाठीचा हा वारीचा अट्टाहास.
याच गोष्टीचा ध्यास विद्यार्थ्यांना लागावा व विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्माची आवड निर्माण व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन. शे. फारुखसेठ दरवर्षी अशा वारकऱ्यांना पोशाखरुपी भेटवस्तू व मिठाई देऊन त्यांचे सत्कार करत असतात.
कार्यक्रम प्रसंगी वि‌द्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रमोदजी ठोंबरे सर यांनी वारीचे महत्त्व विषद केले. पर्यवेक्षक श्री आरसोडे सरांनी वारक-यांचे तसेच शेख फारूख सेठ यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमात सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी बंधू भगिनीचे सहकार्य लाभले.

Previous articleपरळीत अँड. मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी!
Next articleआमदार राजेश एकडे साहेब इकडे लक्ष देता का? – निधी उपलब्ध असूनही रस्त्याचे काम रखडले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here