Home बुलढाणा समृद्धी महामार्गावर पडले मोठे भगदाड..

समृद्धी महामार्गावर पडले मोठे भगदाड..

42
0

आशाताई बच्छाव

1000555551.jpg

समृद्धी महामार्गावर पडले मोठे भगदाड..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
बुलडाणा:- वाढत्या अपघातांसाठी समृद्धी महामार्ग काही नवीन उदाहरण नाही. शेकडो लोकांना या महामार्गावर आपले प्राण गमवावे लागले. असे असताना, पुढील संभाव्य अपघातासाठी समृद्धी वरील भगदाड कारणीभूत ठरू शकणार असल्याचे दिसून येते. बुलढाण्याहून मुंबईकडे जाणार्या
समृद्धी महामार्गावरील एका लेनला भले मोठे भगदाड पडले आहे. येथून एकच लेन सुरू असल्याने, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. समृद्धीवरील अपघातांच्या घटनांचे शेकडो उदाहरण असताना, तसेच अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या मार्गावर पुन्हा मृत्यूला आवतन देण्याचे एक

कारण समोर आले आहे. ते म्हणजे हे मोठे भगदाड मुंबई कॉरिडॉर चैन नंबर 332.6 क्रमांकावर हे भगदाड पडले आहे. विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसांपासून इथल्या दोन लेन बंद आहेत. ही गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.

Previous articleवसुलीबहाद्दर एएसआय रिढे ‘अटॅच टू कंट्रोल रुम’! पोलीस अधीक्षक कडासने यांचे आदेश; ट्रकचा पाठलाग करणे भोवले
Next articleनांदुरा पंचायत समिती मधील इंजिनीयर 2 हजाराची लाच स्विकारताना एसीबीने रंगेहात पकडले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here