Home जळगाव विठ्ठल नामाची शाळा भरली’ डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ज्ञानदिंडी,पर्यावरण दिंडी व नयनरम्य...

विठ्ठल नामाची शाळा भरली’ डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ज्ञानदिंडी,पर्यावरण दिंडी व नयनरम्य रिंगण सोहळा..

33
0

आशाताई बच्छाव

1000553010.jpg

विठ्ठल नामाची शाळा भरली’ डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ज्ञानदिंडी,पर्यावरण दिंडी व नयनरम्य रिंगण सोहळा..

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर, अशा विठ्ठलमय वातावरणात डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय, चाळीसगावच्या विद्यार्थ्यांचा 16 रोजी वीर सावरकर चौकात आषाढी एकादशी दिंडी रिंगन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,संत वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळयात आकर्षण ठरले.
शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर संस्थेच्या सचिव डाॅ.सौ. शुभांगीताई पूर्णपात्रे यांच्या हस्ते पालखी पुजन करून पालखी सोहळ्याला दिंडीला सुरूवात झाली
यावेळी मुख्याध्यापक रमेश सोनवणे, शिक्षक राजेंद्र वराडे, आनंद जगताप आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, विलास बाविस्कर, हवालदार विनोद भोई, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, विरेंद्र पाटील, पंकज रणदिवे यांनी पालखी पुजन केले.
हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Previous articleआषाढी एकादशीचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स चा उपक्रम…
Next articleदीड हजाराच्या ओवाळनीसाठी, लाडकी बहीण योजनेसाठी सव्वा लाख, लाडकीबहिणीचे आले अर्ज.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here