Home बुलढाणा अंत्रीखेडेकर येथील वार्ड नंबर तीन समस्येच्या विळख्यात नागरिक त्रस्त…

अंत्रीखेडेकर येथील वार्ड नंबर तीन समस्येच्या विळख्यात नागरिक त्रस्त…

25
0

आशाताई बच्छाव

1000548470.jpg

अंत्रीखेडेकर येथील वार्ड नंबर तीन समस्येच्या विळख्यात नागरिक त्रस्त…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :-चिखली तालुक्यातील मौजे अंत्रीखेडेकर येथील वार्ड नंबर तीन मधील कैलास मुरलीधर माळेकर ते अन्ना शामराव माळेकर यांच्या घरा पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या भागातील ग्रामस्थांनी तोंडी वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय अंत्री खेडेकर यांच्याकडे तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय यांनी कोणत्याही प्रकारचे दखल घेतली नाही आणि या भागातील रस्ता सुधा केला नाही त्यामुळे आमच्या अंत्री खेडेकर येथील वार्ड नंबर तीन मधील कैलास माळेकर ते अन्ना माळेकर या रस्त्यावरील ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी सामूहिक उपोषण करण्याचे ठरले आहे सदर उपोषण ही ग्रामपंचायत कार्यालय अंत्री खेडेकर येथे करण्यात येणार आहे तसेच या भागामध्ये ग्रामपंचायतचे नळ आहेत परंतु नळाला पाणी येत नाही लाईट सुद्धा वेळोवेळी सांगून सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय लाईट लावत नाही अशी माहिती त्या भागातील ग्रामस्थ कुणाल राजेश बबरुले तसेच इतर ग्रामस्थ यांनी लेखी तक्रार ग्रामपंचायत कार्यालय अंत्रीखेडेकर याणा देणार आहे तसेच या भागांमध्ये साथीच्या रोगाने डोके वर काढल्यामुळे या भागांमध्ये आजारपणाचे प्रमाण सुद्धा जास्त आहे आणि ग्रामपंचायतला घरपट्टी नाळपट्टी आणि लाईट पट्टी भरून सुद्धा आमच्या नळाला पाणी येत नाही आम्ही सार्वजनिक पट्टी सुद्धा भरतो परंतु या भागामध्ये कोणत्याही प्रकारची सुख सुविधा ग्रामपंचायत कार्यालय अंत्रीखेडेकर यांनी दिलेली नाही आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे आमचे मुले सुद्धा शिक्षणापासून वंचित राहू शकतात. सदर निवेदनावर वार्ड नंबर तीन कैलास माळेकर ते अन्ना माळेकर यांच्या घरापर्यंत रोडवरील भरपूर ग्रामस्थांच्या सह्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here