Home बुलढाणा आता समृध्दी महामार्गावर हे देखील पाप..! एका कंटेनर मध्ये ४० गोवंश, कोंबून...

आता समृध्दी महामार्गावर हे देखील पाप..! एका कंटेनर मध्ये ४० गोवंश, कोंबून कोंबून नेत होते कापायला; हिंदुराष्ट्र सेनेने अडवले…

32
0

आशाताई बच्छाव

1000548466.jpg

आता समृध्दी महामार्गावर हे देखील पाप..! एका कंटेनर मध्ये ४० गोवंश, कोंबून कोंबून नेत होते कापायला; हिंदुराष्ट्र सेनेने अडवले…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
मेहकर :- बुलडाणा एका भल्या मोठ्या कंटेनर मधून गोवंश वाहतूक होत असल्याचे हिंदू राष्ट्रसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळाले. यांनतर तातडीने घटनास्थळी पोहचून तब्बल ४० गोवंशांची सुटका करण्यात आली. काल १३ जुलैच्या मध्यरात्री ही घटना समृद्धी महामार्गावरील (मेहकर नजीक) बाबुळखेड फाट्यावर घडली. कंटेनर चालकास राजस्थानच्या तिघां विरोधात मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. NE

(आर जे १४ जीआर १४५५) क्रमांकाचा राजस्थानचा समृद्धी महामार्गावरील मेहकर येथून जवळ असलेल्या बाबुळखेड फाट्यावर दिसून आला आहे. यामध्ये गोवंश जनावरे कोंबून,
मोनु अवस्थी यांनी हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांना दिली. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी पवार यांना फोनद्वारे हे सांगितले. अवस्थी यांनी पवारांना अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ येण्याचे सांगितले. त्याठिकाणी पोहोचले असता, अवस्थी यांच्यासह इतर काही कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, राजस्थानच्या कंटेनरमध्ये गोवंशाची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. यामुळे हिंदुराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ते कंटेनर अडविले. गाडीमध्ये काय माल आहे? असे कंटेनर चालकाला विचारण्यात आले. बैल घेवून चालल्याचे त्यानी सांगितले. परंतु, हिंदूराष्ट्र सेनेचे विजय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंटेनर उघडून बघितला असता त्यामध्ये ४ गायी व ३६ गोहे असल्याचे दिसून आले. कोंबून व अतिशय क्रूरपणे या जनावरांची वाहतूक होत असल्याचे समजले. गुरांसाठी काहीही चारापाणी ठेवण्यात आलेला नव्हता. विजय पवार यांनी मेहकर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवा केली. कंटेनर, कंटेनर चालक व इतर दोघांना मेहकर येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहम्मद हुसेन यासीन खान (३० वर्ष), हमीट जीवा खान (४० वर्ष), आसाराम बिल अशी आरोपींची न आहेत. तिघेही राजस्थान येथील टोक जिल्ह्यातील सावरिया येथील रहिवासी आहेत.

Previous articleनवऱ्याचा बायकोत लय जीव ! दुसरा बायकोशी बोलला म्हणून केले कांड! मोताळा तालुक्यातील घटना..
Next articleअंत्रीखेडेकर येथील वार्ड नंबर तीन समस्येच्या विळख्यात नागरिक त्रस्त…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here