Home बुलढाणा प्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास …

प्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास …

36
0

आशाताई बच्छाव

1000540717.jpg

प्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास …
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :– सिंदखेड राजा तालुक्यातील प्राध्यापक संजय खडसेमतदान केंद्रांची पाहणी साठी गेले आणि विद्यार्थ्यामध्ये रमलेप्रात्यक्षिकातून शिकविली रान वेडी कविताआणि एस डी ओ मधील प्राध्यापक झाला जागी.उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे दिनांक 10 /7/2024 ला मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा देऊळगाव राजा येथे भेट दिली असता पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी मराठीचा तास चालू होता त्याच पुस्तकातील रानवेडी कविता शिकविली आणि विविध उदाहरण व प्रात्यक्षिकातून समजून सांगितली त्यामुळे विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले

रान वेडी कविता चा अर्थ समजून सांगताना रान काय असते ,त्यासाठी विद्यार्थी याना फळ्यावर डोंगर काढायला सांगितले ,पावसासाठी ढग आणि ढगातून पडणारे पाणी आणि त्या रानवर रानफुल कसे उगवतात त्याचे चित्र मुलांना काढायला सांगितले
तसेच त्या डोंगरावर रान वेडी मुलगी अशी उभी राहते त्याचे चित्र मुलांना काढायला सांगून समजून सांगतील त्या कवितेतील शब्दानुसार गवत फुल समजून सांगण्यासाठी मुलांना बाहेर जावून गवत आणायला सांगतील आणि त्याच्यावर फुल कसे येते ते मुलांना सांगितले आणि त्यानंतर मुलांना कविता म्हणायला लावून सादर कविता चालीवर कसे म्हणता येईल ते मुलांकडून वाचुन घेतले,आणि पुढील भेटीत मला ही कविता पाठ करून दाखवावी असे त्यांनी सांगीतले
प्रा संजय खडसे यानी शिकविलेल्या कवितेमुळे घेतलेल्या क्लास मुळे मुलांना एक वेगळा अनुभव घ्यायला मिळाला ,अशा प्रकारे अधिकारी यांनी दौऱ्यावर असताना शाळेला भेटी दिल्यास विद्यार्थी मध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here