Home अमरावती लाडकी बहीण योजनेचे अर्ज !मिशन मोडवर. महानगरपालिका आयुक्त: झोन न्याय अधिकाऱ्यांना आदेश.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज !मिशन मोडवर. महानगरपालिका आयुक्त: झोन न्याय अधिकाऱ्यांना आदेश.

53
0

आशाताई बच्छाव

1000540669.jpg

लाडकी बहीण योजनेचे अर्ज !मिशन मोडवर. महानगरपालिका आयुक्त: झोन न्याय अधिकाऱ्यांना आदेश.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अमरावती शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून या योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी झोन निहाय अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्य सरकारचा महिला व बाल विकास विभागामार्फत २८ जून पासून लागू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये योजनेची अमरावती शहरात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, लाभार्थ्यांची फरपट होऊ नये, यासाठी मनपा झोन मी आहे अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्यासोबतच विविध उपयोजना करण्याचे आदेश दिले आहेत. लाभार्थी महिलांना बँक खाते उघडण्यासाठी शहरातील बँक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून सर्व लाभार्थी महिलांचे बँक खाते उघडले जातील याची सुनिश्चित करणे महानगरपालिका कार्यालयातील जन्म दाखल्याच्या विभागातून लाभार्थ्यांना जन्म दाखल्याच्या नका तात्काळ पुरविण्यासाठी नियोजन करणे, आपले सरकार सेवा केंद्रावर अर्ज स्वीकृत करणे, तपासणी करणे, पोर्टल वर अपलोड करण्याचे नियोजन करणे, शहरात योजनेची दवंडी देऊन सर्व पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अंमलबजावणी नियोजनबद्ध होईल. लाभार्थ्यांना योजनेचा सुलभ लांब मिळेल, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. योजनेच्या अनुषंगाने अडचण आल्यास महिला बालविकास विभागाशी संपर्क साधावा अशी आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिका झोन स्तरावर या योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्याची सूचना देण्यात आले आहे. लाभार्थी महिला, अंगणवाडी सेविका, बचत गटाचे अध्यक्ष या योजनेचे अर्ज भरून देऊन शकतात. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या शहरातील महिलांनी लाभ घ्यावा अशी आव्हान महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करणे किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनातर्फे कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी पैसे देऊ नयेत. या योजनेचे अर्ज स्वीकारण्याकरता अमरावती महानगरपालिकेत झोन स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. असे सचिन कलंत्री महापालिका आयुक्त यांनी आमच्या प्रतिनिधी सांगितले.

Previous articleअमरावतीतील ३०० महिला चालविणारा गुलाबी ई जिल्ह्यातील दहा हजार महिलांना लाभ.
Next articleअखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या धसक्याने एसटी वाहतूक धामणगाव शहरातून पूर्ववत सुरू.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here