Home जालना भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवात ‘ जालन्यातील कवी भानुदास शेवाळे यांचं काव्य सादर

भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवात ‘ जालन्यातील कवी भानुदास शेवाळे यांचं काव्य सादर

34
0

आशाताई बच्छाव

1000529368.jpg

भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवात ‘ जालन्यातील कवी भानुदास शेवाळे यांचं काव्य सादर

जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक ०९/०७/२०२४

रविवारी ७ जून रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे नुकतेच आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाची सांगता झाली . त्यात जालना जिल्ह्यातील भानुदास शेवाळे यांच्या सह देशभरातून कवी व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काव्यमहोत्सवात सहभाग घेऊन काव्यवाचन सादरीकरण केले.
पुणे जिल्हा परिषद मुळशी तालुक्यात कार्यरत असलेले शिक्षक साहित्यिक कवीवर्य भिडेवाडाकार गझलकार विजय वडवेराव सर यांनी ‘ भिडेवाडा ‘ देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव आयोजित केला होता.
त्यामध्ये महाराष्ट्र ‘गोवा ‘ गुजरात ‘ कर्नाटक ‘ केरळ ‘ आदी ठिकाणांचे मान्यवर कवी यांनी सहभाग नोंदविला .
माय सावित्री तुला वंदन विजयचे । तूच तर केले चंदन विजयचे । आयोजक मा. विजय वडवेराव सर यांनी भिडेवाडा ,स्मारक होत असल्यानेच त्या निमित्ताने सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी. लोकचळवळ उभी केली .हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे नियोजन सुंदर होते. पहिल्यांदा असे विशेष आगळे- वेगळे काव्य संमेलन ठरले असुन सभागृहातील उपस्थित दोनशे कवी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.एकाच विषयावर खूप सुंदर वेगळ्या रचनांमधील कविता सादरीकरण झाल्या . त्यामुळे मी माझी ” वाड्याची शाळा – भिडेवाडा” हि कविता सादर केली.
विजय वडवेराव सरांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल भिडेवाडाकार हि पदवी बहाल करण्यात आली.
सर्वांना सकाळी चहा, नाश्ता, पोहे, अल्पोपहार, तसेच दुपारी चपाती भात वरण जिलेबीचे जेवण, सर्व साहित्यिकांना सन्मान पत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
सरांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. सरांनी हा सर्व कार्यक्रम विनामूल्य घेतला होता.सावित्रीबाईंचे वंशज प्रतापराव नेवासे सर यांनी सरांना अकरा हजार रुपयांचा चेक मदत म्हणून दिला.तो परत करत खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या मुला- मुलींसाठी खर्च करण्यात यावा यासाठी परत दिला यातच सरांचा मोठेपणा दिसून येतो.
परिचित अपरिचित अनेक साहित्यिकांच्या भेटी झाल्या .
सरांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.

Previous articleअखेर जिल्हा परिषद शाळेजवळ गति अवरोधक लागलेच.! नगरपरिषद प्रशासनाने घेतली शाळेची दखल
Next articleबुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here