Home भंडारा मुकबधीर मतिमंद मुलांचे शाळेत जणू आईवडील व्हा – हरदीप ठवरे

मुकबधीर मतिमंद मुलांचे शाळेत जणू आईवडील व्हा – हरदीप ठवरे

145
0

आशाताई बच्छाव

1000528024.jpg

मुकबधीर मतिमंद मुलांचे शाळेत जणू आईवडील व्हा – हरदीप ठवरे

चांदोरीत ताजश्री मुकबधीर व मतिमंद विद्यालयात प्रतिपाद

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)साकोली तालुक्यातील मुकबधीर व मतिमंद मुलांचे या विद्यालयात आपण जणू आईवडीलच आहोत अशी प्रेमाची वागणूक द्यावी. त्यांना त्यांच्या हालचालींवरून आपण तशी शिकवण देत अश्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक क्षमतेचा विकास घडवावा असे प्रतिपादन चांदोरी/अशोकनगर येथे ताजश्री मुकबधीर व मतिमंद विद्यालयात रविवार ०७ जुलैला अध्यक्ष हरदीप ठवरे यांनी केले. येथे विद्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
ताजश्री बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था उसगांव/चांदोरी तह. साकोली अंतर्गत अशोकनगर येथे ताजश्री मुकबधीर व मतिमंद विद्यालयाचा उदघाटन प्रसंगी संस्था अध्यक्ष हरदीप ठवरे, चांदोरी सरपंच विठ्ठल मसराम, उसगाव माजी सरपंच डॉ. गणविर, सामाजिक कार्यकर्ता दिपक मडामे, मयूर धेटे व इतर उपस्थित होते. विद्यालयात पुजा अर्चना करीत येथे शुभारंभ करण्यात आला. आपल्या भाषणात अध्यक्ष हरदीप ठवरे यांनी सांगितले की, मुकबधीर व मतिमंद मुलांच्या बौद्धिक क्षमतेच्या विकासासाठी शिक्षकवृंदांनी या विद्यालयात आपणच त्यांचे आईवडील आहोत असे त्यांना भास होऊ द्या. प्रेमभावनेच्या शिकवणीतून त्यांना आपलेसे करा. त्यांना त्यांच्या हालचालींवरून तशीच शैक्षणिक शिकवण देत त्यांचा बौद्धिक क्षमतेचा विकास घडवावा असे प्रतिपादन केले. याप्रसंगी उपाध्यक्ष पी. बी. कुटारे, सचिव संघमित्रा ठवरे, कोषाध्यक्ष शोभा कुटारे, सदस्यगण सुशिल रंगारी, राजकूमार ठवरे, सचिन हुमणे यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले. उद्घाटनप्रसंगी या ताजश्री मुकबधीर व मतिमंद विद्यालय अशोकनगर परीसरात विविध प्रजातींची झाडे लावून सामुहिक वृक्षारोपण करण्यात आले. मुकबधीर व मतिमंद मुलांना शैक्षणिक बाबतीत सक्रिय करण्यासाठी या भागात प्रथमच अश्या विद्यालयाची स्थापना सन २०२२ ला करण्यात आली असून शासनाकडून मुकबधीर मतिमंद मुलांना शासकीय योजना, मूलभूत सुविधा व गरजा पूर्ण करण्यासाठी क्षेत्रातील पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यालयात संपर्क साधावा असे कळविले आहे. कार्यक्रमात ताजश्री मुकबधीर व मतिमंद विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here