Home गडचिरोली चामोर्शी शहरातील ५१ कोटी रुपयांच्या विकास कामाची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी...

चामोर्शी शहरातील ५१ कोटी रुपयांच्या विकास कामाची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली पाहणी

66
0

आशाताई बच्छाव

1000495916.jpg

चामोर्शी शहरातील ५१ कोटी रुपयांच्या विकास कामाची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली पाहणी

ग्रामीण रुग्णालय २१.३० कोटी ,तहसील कार्यालय १७.५० कोटी न्यायालय ७.५० कोटी ,नगर पंचायत भवन ५ कोटी गोंड मोहल्ला येथे स्थानिक निधीतून सभागृह २० लक्ष

चामोर्शी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विशेष प्रयत्नातून चामोर्शी शहरांमध्ये विविध विकासकामे सुरू असून त्यातील ग्रामीण रुग्णालय ,तहसील कार्यालय ,दिवाणी नायालय नगर पंचायत भवन , गोंड मोहल्ला येथे स्थानिक निधीतून सभागृह अशा ५१ कोटी रुपयांची बांधकाम काम सुरू आहेत या बांधकामाची पाहणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली.

यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्षा जयश्री वायललवार, उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, बांधकाम सभापती वैभव भिवापूरे, दिलीप चलाख, महिला बाल कल्याण सभापती गीताताई सोरते, पाणीपुरवठा सभापती निशांत नैताम नगरसेविका स्नेहा सातपुते, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख युमो जिल्हा महामंत्री यश गण्यारपवार, सतीश भांडेकर, विलास पिपरे, प्रदीप भांडेकर, राजू धोडरे, विजय गेडाम रामचंद्र वरवाडे, अंशुल दासरवार, यांचे सह बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालय २१.३० कोटी ,तहसील कार्यालय १७.५० कोटी न्यायालय ७.५० कोटी ,नगर पंचायत भवन ५ कोटी गोंड मोहल्ला येथे स्थानिक निधीतून सभागृह २० लक्ष रुपयांची कामे सुरू असून या कामांची पाहणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नियोजित वेळेत कामे पुर्ण करण्याचे निर्देश दिले.

Previous articleगावभेटीतून विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी साधला नागरिकांशी संवाद
Next articleमुखेड येथील संविधान रक्षक कृती समितीच्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here