Home बुलढाणा सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरु,वरवंड ते रुईखेड टेकाळे रस्त्याच्या साईडच्या कामात...

सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरु,वरवंड ते रुईखेड टेकाळे रस्त्याच्या साईडच्या कामात चक्क काळ्या मातीचा वापर, कामही निकृष्ट दर्जाचे,अभियंता साखर झोपेत….

31
0

आशाताई बच्छाव

1000481349.jpg

सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरु,वरवंड ते रुईखेड टेकाळे रस्त्याच्या साईडच्या कामात चक्क काळ्या मातीचा वापर, कामही निकृष्ट दर्जाचे,अभियंता साखर झोपेत….
युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा जिल्हा संजय पन्हाळकर
बुलडाणा :-पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत करण्यात येत असलेल्या वरवंड ते रुईखेड टेकाळे रस्त्याच्या कामात चक्क काळ्या मातीचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतात तीन ते साडेतीन फूट रुंदीची नाली तर काही शेतकऱ्यांच्या शेतात एक ते दीड हाताची नाली खोदण्यात आली आहे रस्त्याच्या बाजुला असलेली काळी माती खोदून तीच रस्त्यावर आंथरली जात आहे. सदरील रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून कंत्राटदार कंपनी सर्व नियम धाब्यावर बसवून काम करतअसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे सदरील रस्त्याचे काम हे थांबविण्यात यावे अशी मागणी वरवंड येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी असताना चांगल्या दर्जाचे रोडचे बांधकाम साहित्य वापरून हे काम होणे अपेक्षित असताना, थातूर – मातुर काम उरकून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न संबंधित कंत्राटदार कंपनी करत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून येते.
अतिरिक्त रस्त्यावर खडीकरण आणि मुरूम टाकून सद्यस्थितीत असलेल्या रस्त्याच्या समतल रस्ता तयार करणे अपेक्षित आहे. या उलट संबंधित कंत्राटदार कंपनी खडी आणि मुरुमाचा वापर न करता काळ्या मातीचा वापर करत आहे. नियमानुसार बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या देखरेखीखाली काम केले जाणे अपेक्षित आहे.अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार काम केले जात आहे किंवा नाही हे पाहणे अभियंत्याचे काम आहे सुधारणा सुचविण्याची जबाबदारी संबंधित अभियंत्यांची असते.या कामाच्या बाबतीत सबंधित अभियंता जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत असल्याची शंका या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here