Home बुलढाणा बुलढाणा पोलीस शिपाई पदाकरीता शारिरीक मोजमाप चाचणी/मैदानी चाचणी ही १९ जून ते...

बुलढाणा पोलीस शिपाई पदाकरीता शारिरीक मोजमाप चाचणी/मैदानी चाचणी ही १९ जून ते ५ जुलै या

33
0

आशाताई बच्छाव

1000473000.jpg

बुलढाणा,-संजय पन्हाळकर:- बुलढाणा पोलीस शिपाई पदाकरीता शारिरीक मोजमाप चाचणी/मैदानी चाचणी ही १९ जून ते ५ जुलै या कालावधीत होणार असून पोलीस शिपाई (बॅण्डस्मन) पदाकरीता शारिरीक मोजमाप चाचणी/मैदानी चाचणी ही २ ते ३ जुलै या कालावधीत होणार आहे. शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता सुरुवातीचे २ दिवसांमध्ये ५०० व उर्वरित दिवसांनध्ये ८०० प्रमाणे उमेदवार दररोज उपस्थित राहणार असुन उमेदवारांनी मुळ आवेदन अर्ज, मुळ प्रवेश पत्र, आवेदन अर्ज भरतानांचे ३ पासपोर्ट फोटो, स्वतःची ओळख पटविण्यासाठी (अ) मुळ आधार कार्ड (ब) ङमतदान ओळखपत्र (क) वाहन परवाना / पॅनकार्ड या कागदपत्रासह पोलीस मुख्यालयाचे मैदानावर हजर रहावे. तसेच उमेदवारांनी देखील त्यांचे शैक्षणिक इ. कागदपत्रे सुस्थितीत आक्षेप व इतर अडीअडचणीचे अनुषंगाने भरती सक्षम प्राधिकारी/अपीलीय अधिकारी यांचेकडुन वेळीच निरसन करण्यात येईल. तसेच दैनिक मैदानी चाचणीचे निकालपत्र माहिती नमुद केली आहे त्याच आधारे दररोज मुख्यालयाचे सुचना फलकावर व जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे उमेदवारांचे प्राथमिक कागदपत्राची तपासणी करणार येणार असून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची मुळ कागदपत्र फेर तपासणी करण्यात येणार आहे. सदर फेर तपासणीमध्ये शैक्षणिक कागदपत्रे, इतर प्रमाणपत्र खोटी, मुदतबाह्य अथवा चुकीची आढळुन आल्यास उमेदवाराला भरतीच्या कोणत्याही टप्यावर बाद करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. सदर पोलीस शिपाई पद भरतीचे सदर भरती प्रक्रिया ही तटस्थपणे, निःपक्षपातीपणे व पारदर्शक होणे करीता मैदानावर व मैदानाच्या परीसरामध्ये ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असुन पद भरतीच्या प्रत्येक टप्यावर उमेदवारांची व्हीडीओ शुटींग / सीसीटिव्हीचे चित्रीकरण होणार आहे. उमेदवारांनी कोणतेही उपकरण सोबत ठेवु नये व कोणताही गैरप्रकार (डमी उमेदवार उभा करणे इत्यादी) होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर बाब भरती प्रक्रिये दरम्यान निदर्शनास आल्यास संबंधीत उमेदवाराला भरती प्रक्रियेमधुन बाद करुन त्याचे विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याबाबत कालावधीत जिल्हा पोलीस दलातील गोपनिय यंत्रणा कार्यान्वीत राहणार असून उमेदवारांनी कोणचाही प्रलोभन / आमिषास बळी पडू नये व कोणताही गैरप्रकार होत असल्याचे निर्दशनास आल्यास त्याबाबतची माहिती प्रत्यक्ष अवगत करुन द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here