Home बुलढाणा हिवरा आश्रम परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ७० हजारांचा ऐवज केला लंपास,नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण...

हिवरा आश्रम परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ७० हजारांचा ऐवज केला लंपास,नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण …

31
0

आशाताई बच्छाव

1000464439.jpg

हिवरा आश्रम परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ७० हजारांचा ऐवज केला लंपास,नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण …
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
मेहकर –मेहकर तालुक्यातील आश्रम,ता.१३ :-साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या हिवरा आश्रम परिसरात चोरटयांनी चोरीचा धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांमध्ये कमालीच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरटयांनी वेगवेगळया ठिकाणी चोरी करून अंदाजे ७० हजार ५०० रूपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. १३ जून च्या रात्री घडली. याबाबत हकिकत अशी की, विवेकानंद कृषि महाविद्यालयात कार्यरत असलेले विशाल विष्णू परिहार हे गावाकडे पेरणीच्या कामानिमित्‍त गेले होते. विशाल परिहार यांच्या घराचे कुलूप कडीकोंडा तोडून चोरटयांनी घरात प्रवेश करीत कपाटातील 7 ग्रॅम सोन्याचे मनी डोरल व नगदी रोख 3500 रुपये असा एकूण 30500 रु चा माल चोरुन नेला आहे. तसेच काशीराम सावळे याचे घराचे कुलूप कडीकोंडा तोडून नगदी 5000 रुपये व विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. मनोज मुरलीधर मुऱ्हेकर याची घरासमोर उभी असलेली होंडा शाइन कंपनीची दुचाकी गाडी क्रमांक MH 28 V 9438 अंदाजे 15000 रुपये तर चोरटयांनी आपला मोर्चा हिवरा आश्रम येथून जवळ असलेल्या गजरखेड फाट्याकडे वळविला. या फाटयावर गणेश सोळंकी यांचे वेल्डींगचे दुकान आहे. चोरटयांनी दुकान फोडून वेल्डींग दुकानातील सर्व सामान मशीन सह २० हजार रूपये किंमतीचा माल लंपास केला. हिवरा आश्रम परिसरात चोरट्यांनी वेगवेगळया ठिकाणी धुमाकूळ घालून अंदाजे 70 हजार 500 रूपये किंमतीचा माल अज्ञात चोरटयांनी लंपास केला. सदर घटनेची तक्रार विशाल विष्णु परिहार यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिली. त्‍यावरून अज्ञात चोरटया विरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास साखरखेर्डा ठाण्याचे ठाणेदार स्वप्नील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास बिट जमादार पोहेकॉ प्रविण गवई हे करीत आहे. तर मेहकर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या हिवरा आश्रम गावाचे पोलीस पाटील रवि घोंगडे यांचे ब्रम्हपुरी फाट्याजवळ पेट्रोलपंप आहे. पेट्रोलपंपाच्या पाठीमागच्या गोठयातून दोन मोटरी पंप अंदाजे किंमत २० हजार रूपये अज्ञात चोरटयांनी लंपास केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here