Home नांदेड नंदराज रुंजे यांनी दहावी बोर्ड परीक्षेत ९७.२० % घेऊन मिळवले घवघवीत यश.

नंदराज रुंजे यांनी दहावी बोर्ड परीक्षेत ९७.२० % घेऊन मिळवले घवघवीत यश.

49
0

आशाताई बच्छाव

1000410866.jpg

नंदराज रुंजे यांनी दहावी बोर्ड परीक्षेत ९७.२० % घेऊन मिळवले घवघवीत यश.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी निकाल जाहीर झाला आहे.यात संगुचीवाडी येथील
नंदराज शिवराज रुंजे यांनी उत्तुंग यश मिळवलंय. तो श्री देशिकेंद्र विद्यालय लातूर येथे शिकत होता . त्याला तब्बल ९७.२० टक्के गुण मिळाले आहेत .घरची परिस्थिती गरीबीची, अशा बिकट आर्थिक परिस्थितीत अभ्यासात एकाग्रता, सातत्य, ध्येयप्राप्ती चिकाटी असलेल्या संगुचीवाडी येथील नंदराज शिवराज रुंजे या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावी परिक्षेत ९७.२० टक्के गुण मिळवून आई वडीलांच्या श्रमाचे चीज केले आहे.
नंदराजच्या यशाबद्दल त्याचा चुलता ( काका) सांगतात की, “माझा पुतण्या हुशार आहे. त्याने दहावीत जवळपास ९८ % मार्क्स घेतले आहेत . त्याला पुढे जे काही करायचं आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.” “त्याने मिळवलेले चांगले मार्क्स पाडून रुंजे कुटुंबात चांगलं यश मिळवलं आहे. त्याचा आम्हाला गर्व आहे.”भविष्यात त्याला जे पण करायचं आहे त्यासाठी मी त्याच्यासोबत आहे, असं चुलता ( काका ) कैलास पांडुरंग रूंजे यांनी सांगितलं.ते पुढे म्हणाले की माझा पुतण्या डॉक्टर बनावा ही आमची इच्छा आहे आणि माझा पुतण्या आमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल .
त्याच्या यशात आजी ,आजोबा ,आई , काका , काकू, आत्या – मामा यांच्या पाशी शिक्षण घेऊन यश मिळवले , शाळेतील शिक्षक ,नातेवाईक यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे .त्याच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षक यांनी पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्या दिल्या. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here