आशाताई बच्छाव
उद्योजक व कामगारांनी भाजपा कायम ठेवावा: प्रमोद वाकोडकर
ना. दानवे यांच्या प्रचारार्थ औद्योगिक वसाहतीत भेटी
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेत उद्योजक आणि कामगारांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून भारताला महासत्ता करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करावे लागेल त्याकरिता उद्योजक आणि कामगारांनी कमळ निशाणी समोर मतदान करावे असे आवाहन भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी केले.
जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ वाकोडकर यांनी शुक्रवारी ( ता. 10) जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत भेटी देऊन उद्योजक आणि कामगारांसोबत संवाद साधला. यावेळी जालना लघु उद्योग भरतीचे अध्यक्ष किशोर देविदान, पंकज कासलीवाल, सुधीर नाईक, सेजल कदम, भाजपा उद्योग आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष उद्योजक भगवान पाडळे, उपाध्यक्ष तथा समन्वयक अनिल यशवंते, जिल्हाध्यक्ष निखिल चेचाणी ,राजेंद्र तापडिया, सविता कुलकर्णी, ऋचा जोशी, अतिक खान, धनराज काबलीये, आदींची उपस्थिती होती.
जालना लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष किशोर देविदान म्हणाले, देशाच्या प्रगतीचा प्रमुख स्त्रोत असलेल्या उद्योगांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सवलती देऊन मदत केली असून ना. दानवे यांचे उद्योजकांना वेळोवेळी सहकार्य आणि पाठबळ राहिले आहे. असे सांगून या निवडणुकीत उद्योजक आणि कामगार ना.दानवेंना आपला भरघोस पाठिंबा कायम ठेवतील. असे देविदान यांनी स्पष्ट केले.
अतिक खान म्हणाले, जालन्यातील उद्योजकांनी कोविड काळात ऑक्सिजनचा पुरवठा केला ना. दानवे यांच्या पाठीशी उद्योजक खंबीरपणे उभे असून आहेत.