Home बीड महात्मा बसवेश्वरांचे समाज परिवर्तन घडवण्यात मोठे योगदान- अँड.मनोज संकाये

महात्मा बसवेश्वरांचे समाज परिवर्तन घडवण्यात मोठे योगदान- अँड.मनोज संकाये

35
0

आशाताई बच्छाव

1000362883.jpg

महात्मा बसवेश्वरांचे समाज परिवर्तन घडवण्यात मोठे योगदान- अँड.मनोज संकाये

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी 
१२ व्या शतकातील महान संत व समाज सुधारक अशी ओळख असणारे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात अक्षय तृतीयेच्या पावन पर्व दिनी मोठ्या थाटामाटात महाराष्ट्र सह कर्नाटक आंध्र प्रदेशांमध्ये साजरी केली जाते. महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत समाजाची स्थापना केली तसेच समाज परिवर्तन घडवण्यासाठी मोठे योगदान दिले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केले. जगत ज्योती महात्मा संत बसवेश्वर यांची जयंती परळी येथील विद्यानगर परिसरातील गार्डन मधील जगत ज्योती संत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि जयंती साजरी करून मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परळी नगरपालिकेचे नगरसेवक संजय फड उपस्थित होते. हिंदू धर्मामध्ये अनिष्ट चालीरीती आणि रुढीपरंपरा या मोठ्या प्रमाणावर बाराव्या शतकात होत्या त्यांना छेद देत संत बसवेश्वरांनी नवीन समाजाची उभारणी केली. स्त्रिया वरील अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. सर्वधर्म समभाव आणि जातीभेद रहित अशा लिंगायत समाजाची स्थापना करून सर्वांना आदर्श जीवन जगण्याचा मूलमंत्र यांनी दिला. लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला लिंगायत धर्माची शिकवण त्यांनी सर्वसामान्य माणसापर्यंत रुजवण्यासाठी अहोरात्रपणे परिश्रम घेतले. यावेळी राहुल कांदे ,अनिल चौधरी, संदीप चौधरी, शिवा बडे, मोहन चव्हाण (पत्रकार) ,काशिनाथ सरवदे, कैलास वारद, मुंजाभाऊ साठे, संतोष कांबळे, सुंदर आव्हाड, अशोक सूर्यवंशी, राम गडदे, वसंत मुंडे, योगेश मुंडे, जयसिंग रोडे, बाळू मुंडे, बालासाहेब मुंडे, गोविंद कांदे, राम चाटे, परमेश्वर गिरी, महादेव कांदे, वैजनाथ कांदे, धनराज रोडे, बंडू मुंडे, अर्जुन मुंडे , के .के .कांदे, स्वप्निल, गोविंद दहिवाळ यांच्यासह मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here