आशाताई बच्छाव
शहरातील सी. सी. टीव्ही कॅमेरे बंद.
देगलूर तालुका प्रतिनिधी (गजानन शिंदे )
गणेश उत्सव व दुर्गा महोत्सव च्या काळात देगलूर शहरातील रोडवरील सी. सी टीव्ही कॅमेरे मागील दोन महिन्यापासून बंद
देगलूर नगरपालिका हद्दीतील शहरात व मेन रोड व तसेच इतर अनेक ठिकाणी नगर पालिकेने मोठ्या प्रमाणात सी.सी टीव्ही कॅमेरा बसविण्यात आले होते.देगलूर शहर हे जिल्हातील सर्वात मोठे शहर आहे अशी ओळख आहे. या ठिकाणी अनेक बाजारपेठा आहेत व तसेच देगलूर शहराला व तालुक्याला लागूनच आंध्र, तेलंगना व कर्नाटक बॉण्ड्री लागून असून,मुख देगलूर शहरातून अनेक वाहने परराज्यात जात येत असतात,अशा या ठिकाणी देगलूर मध्ये मोठ्या दिमाखात सी. सी. टीव्ही कॅमेरे बसाविण्यात आलेले आहेत.
शहरात याचे नियंत्रण पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहेत व तसेच या ठिकाणी अनेक गाड्या या मोठ्या प्रमाणात चोरीस जात आहेत व शहरात अनेक व्यापारी ठिकाणे असून जनतेचे लूटमारी होत असून. सी.सी. टीव्ही कॅमेरे चालू नसल्यामुळे अनेक काळे बाजार होत आहेत,व अनेक घटना घडत आहेत त्या साठी सी. सी. टीव्ही कॅमेरे चालू असणे गरजेचे आहे.
तसेच सध्या गणेश उस्तव सण आला आहे आणि पुढे दुर्गा महोत्सव येणार आहे अशा अति-संवेदनशील कार्यक्रमास सी. सी. टीव्ही नसल्यामुळे रोडवर महिलांना व अनेक वाहणामुळे जनतेला त्रास होत आहे.असे निवेदन शिवसेना (ठाकरे गट )कार्यकर्ते तर्फे पोलीस निरीक्षक आणि जिल्हा अधिकारी यांच्या कडे देण्यात आले आहे