आशाताई बच्छाव
काकनवाडा खुर्द च्या सरपंचांनी बळकावला गोठा शासनाचा झाला आर्थिक तोटा”
कार्यवाही साठी ग्रामस्थांनी उपोषणाचा निर्णय घेतला मोठा.!
(ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्युरो चीफ बुलढाणा)
संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा खुर्द येथील तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर दयाराम अढाव व गावातील इतर शेतकरी नागरिकांनी दिनांक ४ सप्टेंबर रोजी संग्रामपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले होते की कोणत्याही आस्थापनेमध्ये एखाद्या पदावर कार्यरत असतांना त्या आस्थापनेच्या योजनांचा लाभ आस्थापनेतील पदाधिकारी घेण्यास अपात्र असतात परंतु असे न करता ग्रामपंचायत काकणवाडा खुर्द. येथील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाची व ग्रामस्थांची दिशाभूल करून स्वतः सरपंच गोपाल दयाराम अढाव व त्यांचे भाऊ गोविंदा दयाराम अढाव यांनी महात्मा गांधी ग्रामरोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा लाभ सर्व नियम व अटी धाब्यावर बसवूनच घेतला असल्याचा आरोप तक्रारी नमूद करण्यात आला होता. त्या लाभार्थ्यांकडे नियमानुसार कोणतेही गुरे ढोरे व वृक्ष लागवड केलेली नसतांना त्यांना कोणत्या परिपत्रकानुसार गुरांच्या गोठ्याचा लाभ देण्यात आला हा प्रश्न निर्माण होत आहे.तसेच ग्रामपंचायतमध्ये जाऊन सर्व समान्य नागरीक म्हणुन विचारणा केल्यास शासकीय कामात अडथडा निर्माण केला अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करू अशा धमक्या सरपंचाकडुन देण्यात येतात. तक्रारीत नमूद केल्याल्या सर्व प्रकाराची तात्काळ चौकशी करुण दोषींवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १४ छ नुसार कार्यवाही करण्यात यावी व गरजु लाभाथ्र्यांची निवड करुण त्यांना लाभ देण्यात यावा परंतु संबंधित विभागाकडून कुठलीही कार्यवाही गेल्या पंधरा दिवसात करण्यात आली नाही अखेर वरील मागणीसाठी पुन्हा दिनांक 20 सप्टेंबर2023 रोजी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली असून तक्रार करते यांनी पारदर्शक चौकशीची व कार्यवाहीची मागणी रेटून धरली आहे तक्रारी प्रमाणे कार्यवाही न झाल्यास येत्या 3 ऑक्टोंबर 2023 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर यांच्या कार्यालयासमोर तक्रारदार हे आमरण उपोषणास बसणार त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार संबंधित अधिकारी हेच राहतील असे तक्रार कर्ते यांनी गटविकास अधिकारी संग्रामपूर यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले असून तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी बुलढाणा, कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, तहसीलदार संग्रामपूर, पोलीस स्टेशन तामगाव यांना देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे गटविकास अधिकारी संग्रामपूर यांनी नेहमीप्रमाणे भ्रष्टाचार दाबण्यासाठी कुठल्याही दबावाला बळी न पडता शासनाची झालेली आर्थिक लूट लक्षात घेत काकनवाडा खुर्द येथील ग्रामपंचायतचे गबाळ उघडकीस आणण्यासाठी पारदर्शक चौकशी केल्यास नियमबाह्य गुरांचा गोठा मंजूर करणाऱ्यांसह अनेक मासे जाळ्यात अडकतील असे तक्रारदार यांच्याकडून बोलले जात आहे.