आशाताई बच्छाव
शहीद स्मृती दिन सोहळा चिमुर येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोकजी नेते
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थित सोहळा संपन्न ……..
चिमुर /गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):
स्वतंत्र क्रांती चिमुर १६ ऑगस्ट १९४२ च्या स्वातंत्र्य क्रांती लढयाच्या ८० व्या वर्षा निमित्य स्वतंत्र क्रांतीतील चिमुर संग्रामातील शहीद वीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी अतिवृष्टीने व पुराच्या पाण्याने तसेच सततच्या येत असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली.अनेक (भात) धान्य,कापुस,सोयाबिन हि पिके नष्ट झाली.शेतकऱ्याला अनेक अडचणी येत असून अशा या विविध अडचणीतून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.त्यामुळे या कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांना झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती लक्षात आणून दिले.व पंचनामे करून भरपाई देण्यात यावे. असे याप्रसंगी या क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी लक्ष वेधले.तसेच मुरपार कोयला खनिज खाण आहे त्यामध्ये अनेक मजूर वर्ग काम करतात. मुरपार कोयला खनिज खाण बंद झाल्यास अनेक मजुर वर्गावर उपासमारीची पाळी येईल. त्याकडे सुद्धा लक्ष देण्यात यावे.असे प्रतिपादन खा.अशोकजी नेते या कार्यक्रमाप्रसंगीे केले.
त्यावेळी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,
सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री,राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,
गिरीषजी महाजन मंत्री,माजी केंद्रीय मंत्री हंसराजभैया अहिर,मितेशजी भांगडिया माजी वि.प.आम. आम.कीर्तीकुमार उर्फ बंटी भाऊ भांगडिया,आमदार डॉ.देवराव होळी,आम.कृष्णाजी गजबे,आम. किशोर जोरगेवार,माजी.आ.सुधिर पारवे,माजी.आ.संजय धोटे, देवराव भोंगळे जिल्हाध्यक्ष,अविनाश पाल ओबिसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष,तसेच ज्येष्ठ नेते,पदाधिकारी,भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, तसेच हजारोच्या असंख्यनेे कार्यकर्ते उपस्थित होते.