Home चंद्रपूर चंद्रपूर गडचिरोली महामार्गावर अपघात ;चार जण जागीच ठार

चंद्रपूर गडचिरोली महामार्गावर अपघात ;चार जण जागीच ठार

182
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0046.jpg

चंद्रपूर/सावली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसान नगर येथे मध्यरात्री च्या सुमारास बोलेरो ने प्रवास करणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याने त्यात ४ जण जागीच ठार तर १ जण जखमी झाल्याची घटना मध्यरात्री झाली.
गडचिरोली येथील प्रसिद्ध डिजे वादक पंकज बागडे हे सावली तालुक्यातील विहीरगाव येथील अनुप ताडूलवार या आपल्या मित्रा सोबत चंद्रपूर येथे डिजे च्या काही साहित्य खरेदी साठी बोलेरो गाडी क्रमांक MH ३३ A ५१५७ ने गेलेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत अनुप ची पत्नी व साळा ही सोबत होता.
साहीत्य खरेदी करून परत गावाकडे येत असतानाच सावली तालुक्यातील किसाननगर येथे मुख्यमार्गावर गाय बसलेली होती तिला वाचविण्यासाठी कट मारत असताना स्टेरिंग राळ तुटला आणि गाडी ही त्या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अपघात झाल्यानंतर जोरदार आवाज झाला.त्यानंतर किसानगर व व्याहड खुर्द येथील काही सावली पोलिसांना माहिती दिली.
सावली चे ठाणेदार आशिष बोरकर हे घटनास्थळी दाखल होत तेथील स्थानिकांची मदत घेत त्या अपघात ग्रस्ताना बाहेर काढले.व तेथील मृतकाना व जखमी ला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.
या अपघातात पंकज किशोर बागडे वय २६ रा.गडचिरोली,
अनुप रमेश ताडूलवार वय ३५ वर्ष रा.विहीरगाव ता.सावली,
महेश्ववरी अनुप ताडूलवार वय २४ वर्ष रा.विहीरगाव,मनोज अजय तीर्थगिरीवार वय २९ रा.ताडगाव ता.भामरागड जिल्हा गडचिरोली यांचा मृत्यू झाला तर सुरेंद्र हरेंद्र मसराम वय २३ वर्ष रा.चिखली ता.सावली जिल्हा चंद्रपूर हे जखमी झालेले आहे.
अपघाताचा तपास सावली पोलीस करीत आहे.
या अपघातात मृत्यू पावलेले गडचिरोली येथील डिजे संघटना चे अध्यक्ष पंकज बागडे चा मृत्यू झाला. पंकज डिजे म्हणून प्रसिद्ध आहे.तर विहीरगाव येथील माजी सरपंच ताडूलवार यांचा मुलगा व सून या दोघांचा अपघातात मृत्यू झाला तर अनुप चा साळा मनोज ही मरण पावला.या सर्वांच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Previous articleसोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला तिरंग्याच्या स्वरूप देण्यात आले.
Next articleतेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट तालुक्यातील कोलामगुडा येथे आज घरोघरी तिरंगा चा अभिनव शुभारंभ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here