आशाताई बच्छाव
नंदुरबार : कृषी विभागाच्या पथकाने सव्वा लाखाचे बोगस बिटी बियाणे केले जप्त, कंपनीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. नंदूरबार नंदुरबार,( सागर कांदळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
नंदूरबार तालुक्यातील पिंपळोद येथील एकाच्या घरातून 1 लाख 11 हजार 400 रुपयांचे बिटी बियाणे कृषी विभागाच्या पथकाने जप्त केले असून,या प्रकरणी बियाणे कंपनीसह अज्ञात वाहतूकदार व पिंपळोद येथील एकाविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खरीप हंगाम 2022-2023 साठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आले असून बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे,रासायनिक खते, कीटकनाशकांच्या
गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक तसेच तालुकास्तरावर सहा असे सात भरारी पथक गठित करण्यात आली आहेत.
नंदूरबार येथील
पथकाला माहिती
मिळाल्यामुळे पथकाने नंदूरबार
तालुक्यातील पिंपळोद येथील निलेश राजाराम पाटील यांच्या घरी दि. 28 मे रोजी 11 वजेच्या सुमारास जाऊन तपासणी केली
असता
विनापरवाना कापुस बियाण्याचे उत्पादन साठवणुक करून विक्री करतांना मिळून
आला.यावेळी पथकाला ८६ हजार ४०० रु. कि. Golden ५४G चे बियाणे पाकीट संख्या ७२ प्रति. पाकीट किंमत १२०० रुपये दराप्रमाणे. २५ हजाराचे कि . SHIVSM वाणाचे नाव बियाणे पाकिट संख्या २५ प्रति प्रति पाकीट १ हजार दराप्रमाणे. असा एकुण १ लाख ११ हजार 400 रु. कि. मुद्देमाल हस्तगत केला.
संशयित आरोपी यांनी बोगस विनापरवाना HTBT कंपनीचे कापुस बियाण्याचे उत्पादन वितरण साठवणुक करून छुव्या पध्दतीने विक्री करतांना मिळून आला म्हणून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र धरमदास पाडवी यांच्या फिर्यादीवरून
नंदूरबार उपनगर पोलिस ठाण्यात सदर बियाणांची उत्पादन करणारे कंपनी, सदर उत्पादनाचे मालक वाहतुकदार व जबाबदार व्यक्ती तसेच निलेश राजाराम पाटील रा. पिंपळोद ता. जि. नंदुरबार यांच्या विरुद्ध
बियाणे का. क. १९६६ चे कलम २ ( ८ ) २ ( ११ ) व ७ (A ) ७ (C) ७ (D ) १४ (E) चे उल्लंघन सह २ ) म. का. बियाणे कायद २०० ९ चे कलम २ (१) (VII) व (२XII ) ११ ( १ ) उल्लंघन केले आहे . ३ ) पर्यावरण संरक्षण का. १९८६ चे कलम ७, ८ GEAC १ ९ ८३ नियम ७ ( १ ) ७ ( ४ ) ८ व १० चे उल्लंघन केले आहे ४) अत्यावश्यक वसतु कायदा क. १९५५३ व ९ चे उल्लंघन केले ५ ) भादंवि कलम ४२० ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.स.ई प्रशांत राठोड करीत आहेत.
दरम्यान बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी पथकासह पोलिस मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी दिली.