Home नांदेड चलो दिल्ली ! चलो दिल्ली!! चलो दिल्ली!!! व्यर्थ ना होवो अमर बलिदान...

चलो दिल्ली ! चलो दिल्ली!! चलो दिल्ली!!! व्यर्थ ना होवो अमर बलिदान !

258
0

राजेंद्र पाटील राऊत

चलो दिल्ली ! चलो दिल्ली!! चलो दिल्ली!!!
व्यर्थ ना होवो अमर बलिदान !

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देशाच्या स्वांतत्र्यसाठी आपले अमूल्य जीवनाची बलिदान दिलेली महान स्वांतत्र्यवीर भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांचा बलिदान दिनानिमित्त दि.२३ मार्च २२ रोजी नवी दिल्ली येथे जय भारत माता सेवा समिती, नवी दिल्ली च्या वतीने देश भक्ती कार्यक्रम आयोजित केला आहे.
नवी दिल्ली येथील संसद भवन जवळील तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदगुरु श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात बुधवार दि.२३ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता अमर बलिदान दिनानिमीत्त देशभक्ती कार्यक्रम आयोजित केला आहे.जीव महत्वाचे नाही, देश महत्वाचे आहे.देहपुजा करण्यापेक्षा प्रथम देश पुजले पाहिजे म्हणून समस्त देश बांधवांना हे शूरवीरांच्या बलिदान देश बांधवांच्या मनात सदास्मरणार्थ राहावे या प्रमुख उद्देशाने श्री सदगुरु हवा मल्लिनाथ महाराजांनी अमर बलिदान दिनानिमित्त देशाच्या राजधानी दिल्ली येथे देश भक्ती कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातून रेल्वे, बस क्रुझर जीपच्या माध्यमातून सुमारे 20 हजार देशभक्तना घेवून जाण्याची जय्यत तयारी जय भारत माता सेवा समिती नांदेड शाखाच्या वतीने करण्यात येत आहे. दिल्ली येथे सदर कार्यक्रमास सोमवार दि.२१ मार्च रोजी सकाळी नांदेड येथून रेल्वेने जायचे आहे. ज्याना दिल्ली येथे रेल्वेने यायचे आहे अशा शिवभक्त आणि देशभक्तांनी मंगळवार दि.८ मार्च पर्यंत मो. क्र. , 9423136757, 9561021150 , 9823744108 वर संपर्क साधावा असे आवाहन जय भारत माता सेवा समिती नांदेड शाखाच्या वतीने करण्यात आला आहे.

Previous articleमालेगांव महापालिकेचा महाप्रताप एम.बी.शुगर दिली बेकायदेशीर पाईपलाईन;माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला भांडाफोड..!
Next articleबिल्लाळी ता. मुखेड येथे हरबरा खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here