राजेंद्र पाटील राऊत
चारोटी येथे मृत्युंजय दुतांचे उल्लेखनीय कामगिीबद्दल सत्कार.
पालघर (वैभव पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क) म पो केंद्र चारोटी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्य ७. १५वा. ध्वजारोहन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला १६ अमलदार व मृतुन्जय दूत उपस्थित होते मार्च २०२१ ते जुलै २०२१ मध्ये एकूण ४५ अपघात झाले असून मृत्युंजय दूतांनी केलेल्या सहकार्यामुळे गंभीर अपघातातील २६ अपघातग्रस्तांच्या प्राण वाचवण्यास मदत झाली आहे यामध्ये १ प्रकाश हाडळ २ सुभाष चौरे ३ कुणाल लाडे ४ हरबंस सिंग नंन्नाळे ५ संतोष चौरे ६ मैनुद्दीन खान या मृतुंजय दूताने उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे त्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला चारोटी गावचे सरपंच पोलीस पाटील उपस्थित होते मृत्युंजय दूतांना ग्रामीण रुग्णालय कासा येथील डॉक्टर खांडवे यांनी अपघातातील जखमींना कसे हाताळाव्या हाताळावे याबाबत मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले वाघाडी हायस्कूलच्या दोन मुली १० वी च्या परीक्षेत मिळवल्याने तसेच दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान चे वेळी सदर मुली व त्यांचे शिक्षक यांनी उत्कृष्ट भूमिका निभावल्या ने त्यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.मेढवण ते अच्छाड एकूण ४१ मृत्युंजय दूत नेमलेले असून अपघातातील जखमींचे प्राण वाचवण्यास मृत्युंजय दुतांची मदत होत आहे. मार्च २०२१ ते जुलै २०२१ मध्ये मृतुंजय दुताकडून एकूण २६ गंभीर जखमींचे प्राण वाचविण्यात आले आहेत.अनिल रायपुरे. प्रभारी अधिकारी. म पो केंद्र चारोटी