आशाताई बच्छाव
मोठी बातमी ! माजी आमदार दिलीपकुमार सानंदा शिवसेनेच्या वाटेवर ? आ. गायकवाड यांच्या फार्महाऊस वर एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी पोहचले….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलडाणा शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलडाणा दौऱ्यावर आभार दौऱ्यासाठी आले होते. बुलढाणा शहरातील टिळक नाट्य क्रीडा शहरातील टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानात त्यांनी जाहीर आभार सभेला संबोधित केले. याच सभेत अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले. दरम्यान कार्यक्रम आटोपून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आ. गायकवाड यांच्या फार्म हाऊसवर आयोजित स्नेहभोजनाला हजेरी लावली.. इथेच खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी
आमदार दिलीपकुमार सानंदा हे देखील आ. गायकवाड यांच्या फार्म हाऊसवर शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झाले.
आ. गायकवाड यांनी त्यांच्या राजुर जवळील फार्महाऊस वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड यांच्यासह बरेच नेते देखील यावेळी उपस्थित होते. नुकतेच काँग्रेस मधून शिवसेनेत आलेले विजय अंभोरे देखील यावेळी उपस्थित होते. याचवेळी माजी आमदार दिलीकुमार सानंदा देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी आ. गायकवाड यांच्या फार्म हाऊस वर पोहोचले. माजी आमदार सानंदांच्या या उपस्थितीमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे ती सानंदांच्या शिवसेना प्रवेशाची…