Home बुलढाणा BREAKING! बुलढाण्याचे आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली...

BREAKING! बुलढाण्याचे आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल !

60
0

आशाताई बच्छाव

1001447510.jpg

BREAKING! बुलढाण्याचे आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा:- बुलडाणा महाराष्ट्रातील पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर वादग्रस्त टीका करणारे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांनी पोलीस दलाला “अकार्यक्षम” आणि “हप्तेखोर” असे शब्द वापरून अपशब्द केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्वरित यावर प्रतिक्रिया दिली, ज्यात त्यांनी गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल गंभीर दखल घेतली. “जर गायकवाड असे विधान वारंवार करत असतील, तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हे विधान केल्याच्या काही तासांच्या आत, बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. 27 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाण्यात आभार दौरा आहे, आणि त्याच्या आधीच गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने युतीतील राजकीय परिस्थितीवर तीव्र परिणाम होऊ शकतो.

आ. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांच्या कामकाजावर कडक टीका केली होती. “महाराष्ट्रातील पोलीस दल हे सर्वात अकार्यक्षम आहे. त्यांना हप्ते वाढवण्यातच रस आहे. एखाद्या समाजहिताच्या कायद्यातील सुधारणा झाल्यास, पोलीस केवळ हप्ते वाढवून घेतात,” असे त्यांनी सांगितले. याशिवाय, त्यांची गाडी उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई न झाल्याचे आणि पोलिसांच्या निष्क्रियतेचे आरोपही त्यांनी केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर, गायकवाड यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम 296 आणि 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांतून पोलीस दलावर अप्रत्यक्षपणे केलेल्या आरोपांमुळे राज्यभरात चर्चेला तोंड फुटले आहे. गायकवाड यांचे विधान राज्यातील विविध वृत्तवाहिन्यांवर व्हायरल झाले आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमठल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून उपमुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक नेत्यांनी गायकवाड यांना समज दिली पाहिजे, अशी मागणी केली आहे. गायकवाड यांचे विधान आणि त्यावर केलेली कारवाई यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडालेली आहे. आगामी काळात या मुद्द्यावर आणखी कोणती कारवाई होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here