आशाताई बच्छाव
घाणखेडा (संगमपुर) येथे भैरवनाथ कृपेने अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुरण कथेला सुरुवात
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
जाफराबाद तालुक्यातील घाणखेडा (संगमपुर) येथे भैरवनाथ महाराज कृपेने अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापूराण कथा १५ एप्रिल पासून सुरुवात होत आहे. घाणखेडा (संगमपुर) येथे कार्यक्रमाचे हे १५ वे वर्ष आहे.दैनिक कार्यक्रम सकाळी ६ काकडा ८ ते १० ज्ञानेश्वरी पारायण दगडूबा दांडगे, पंडितराव देशमुख, रामदास जाधव, धनश्री ढाले दुपारी २ ते ४ शिवपुराण कथा ह.भ. प. धनश्री ताई ठाकरे सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० हरी कीर्तन होणार आहे.
१५ एप्रिल मंगळवार रोजी ह. भ.प. एकनाथ महाराज काळे यांचे हरी कीर्तन होईल.वेळ रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत
१६ एप्रिल बुधवार या दिवशी ह.भ.प. दीपक महाराज मोरे यांचे हरी कीर्तन होईल.वेळ रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत
१७ एप्रिल गुरुवार या दिवशी ह.भ.प.धनश्री ताई ठाकरे यांचे हरिकीर्तन होईल.वेळ रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत
१८ एप्रिल शुक्रवार या दिवशी ह. भ.प.दिव्या ताई मोरे यांचे हरिकीर्तन होईल.वेळ रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत
१९ एप्रिल शनिवार या दिवशी ह.भ.प.विष्णु महाराज सास्ते यांचे हरिकीर्तन होईल.वेळ रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत
२० एप्रिल रविवार या दिवशी ह.भ.प.हरी महाराज देवडे यांचे हरिकीर्तन होईल.वेळ रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत
२१ एप्रिल सोमवार या दिवशी ह.भ.प.झगरे गुरुजी त्यांचे हरिकीर्तन होईल.वेळ रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत.
२२ एप्रिल मंगळवार या दिवशी ह.भ.प.प्रल्हाद महाराज कड यांचे हरिकीर्तन होईल. वेळ रात्री ८.३० ते १०.३०पर्यंत.
तसेच या कार्यक्रमाला साथ देण्यासाठी मृदंग वादक व तबलावादक ह.भ.प.बालाजी महाराज गाडेकर.
सिंच वादक ह.भ.प.हर्षल महाराज जाधव तसेच गायनाचार्य ह.भ.प.बालाजी महाराज उबाळे, ह.भ.प.मोरेश्वर महाराज साबळे, ह.भ.प.हर्षल महाराज जाधव, माहोरा भजनी मंडळ ,संगमपुर भजनी मंडळ ,पवन ,युवराज, अनिकेत ,ओम, दत्ता ,गजानन, गिरणारे व समस्त गावकरी मंडळी.
तसेच काकड्याचे नेतृत्व रामदास जाधव करणार आहेत. विणेकरी दत्ता लोखंडे ,उमाजी नाईक, समाधान मोहिते असणार आहेत. तरी पंचक्रोशीतील तसेच गावातील मंडळींनी कार्यक्रमाला भरभरून साथ घ्यावी अशी विनंती भैरवनाथ संस्थान तर्फे करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे संयोजक ह.भ.प. पद्माकर महाराज वाघ हे असणार आहेत.