आशाताई बच्छाव
यंदा २१०० कोटीच्या पीक कर्ज वाटपाचे टार्गेट! पीक कर्ज वाटप दरात १०ते१५ टक्क्यांनी वाढ. दैनिक युवा मराठा पी.एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. जिल्हास्तरीय बैठक समितीच्या डी एल बी सी बैठकीत यावर्षी वाटप करण्यात येणाऱ्या पीक कर्जाचे हेक्टरी दर निश्चित करण्यात आले आहेत त्यानुसार यंदा कापसाला ६९ हजार तर सोयाबीनला ६५ हजार रुपये पीक कर्ज मिळेल याशिवाय हंगामात २१०० कोटीच्या पीक कर्ज वाटपाचे टार्गेट निश्चित करण्यात आले आहे असा प्रस्तावा एस एल डी सी ला देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली डी एल बी सी ची बैठक घेण्यात आली सभेमध्ये शेतकरी प्रतिनिधी नरेंद्र शिंगणे यांनी उत्पादन खर्च वाढल्याने सर्व पिकाच्या कर्जवाटप दरात ०ते१५ टक्क्याने वाढ करावी अशी सूचना केली होती. यावर्षी अंतिम कर्ज वाटपाच्या दरात १० टक्क्यांनी वाढ करण्याची सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली त्यानुसार या वर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी एकत्रित २१०० कोटीचे पीक कर्ज वाटपाचे टार्गेट निश्चित करण्यात आले राज्यस्तरीय तांत्रिक गटाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय झाला यामध्ये खरीप साठी १६५० तर रब्बीसाठी ४५० कोटी कर्ज वाटपाचा बँक निहाय आराखडा निश्चित झाल्याचे आग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितले. आर्थिक वर्ष संपल्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे नियमित खातेदारांना यंदाच्या खरीप साठी पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले दरम्यान जिल्हा समितीने प्रस्तावित केलेल्या बँकनीय पीक कर्ज वाटप लक्ष्मीकाचा प्रस्ताव मजुरीसाठी राज्य समितीला पाठविण्यात आला आहे ती पीक कर्ज वाटपाच्या हेक्टरी दर रुपये कपाशी जिरायेती ६६,५००ते ६९,८०० तसेच संकरित जवारी ३२,९००ते३५,१००, तसेच तुर ४५,७००ते४७,९००, तसेच सोयाबीन ५६९००ते६७,३०० तसेच गहू ४८,४००ते५०,८०० तसेच हरभरा ३४००ते४८,२०० पिक कर्ज वाटपाचे बँकेने लक्षांक एल एल टी सी कडे मंजुरीसाठी पाठवलेल्या प्रस्ताव नुसार यावर्षी खरीपासाठी राष्ट्रीयकृत बँकांना ८७९ ग्रामीण बँकांना २१ कोटी तर जिल्हा बँकेला ७५० कोटी असे एकूण १६५० वाटपाचे टार्गेट निश्चित केले आहे. यासाठी यामध्ये एस एल बी सी मध्ये वर्षानुसार काही प्रमाणात कमी अधिक होण्याचे शक्यता असल्याचे एल डी एम श्याम शर्मा यांनी सांगितले आता काहीच दिवसात खरीप हंगाम सुरू होणार आहे.