
आशाताई बच्छाव
जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन
जालना,(प्रतिनिधी दिलीप बोंडे)- प्रभू येशू ख्रिस्तांनी मानवजातीसाठी जे बलीदान दिले त्यावर आधारित भव्य दिव्य आणि हृदयस्पर्शी द पॅशन ऑफ द क्राईस्ट नाटकाचे आयोजन फेथ फाऊंडेशन, पुणे यांच्या सादरीकरणातून तब्बल 65 कलाकारांच्या अभिनयातून जालना शहरात साकारले जाणार आहे.
हे नाटक दिनांक: 29 मार्च 2025 (शनिवार) रोजी संध्याकाळी 6 वाजता डॉ. फ्रेझर बॉईज हायस्कूल ग्राउंड, जालना येथे सादर करण्यात येणार आहे ख्रिस्ती बांधवांचे पवित्र 40 दिवसांचे उपवास सध्या सुरू असून, या नाटकाद्वारे प्रभू येशूनी मानवजातीसाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव होईल व आध्यात्मिक उन्नती साधता येईल. या नाटकाद्वारे प्रभू येशू ख्रिस्तांच्या त्यागाची आणि प्रेमाची कथा प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. हा कार्यक्रम पाहून प्रत्येकाला आशिर्वाद मिळावा, असा आयोजकांचा उद्देश आहे. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सर्व चर्च, जालना पास्टर्स फेलोशिप आणि ख्रिस्ती समाजाच्या सहयोगाने करण्यात आले आहे. जालनावासीयांनी या पवित्र आणि प्रेरणादायी नाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.