
आशाताई बच्छाव
यूनिक स्कूल तुमसर चे सुयश
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)नवोदय विद्यालय समिती द्वारा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल जाहिर करण्यात आला , यात यूनिक स्कूल तुमसर इयत्या 5 मधील कु.श्रावि सुजितकुमार नवखरे ही विद्यार्थिनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत प्राविण्यप्राप्त ठरली.तिच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या प्रसंगी कु. श्रावी व त्यांच्या पालकांचे स्वागत सत्कार करण्यात आले. संस्थेचे संस्थापक सुधाकर कारेमोरे म्हणाले की,नियमित अभ्यास, जिद्द,चिकाटी आणि सातत्य यातून यशाचा मार्ग मोकळा होतो. कु. श्रावी चे यश त्याचाच एक भाग आहे.यावेळी श्रावी चे पालक सौ.उषा सुजीतकुमार नवखरे व शाळेच्या मुख्याधापिका सौ.भावना कारेमोरे तसेच यूनिक स्कूल चे सर्व शिक्षक वृन्द यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील यशस्वी आयुष्यासाठी मंगलमय सदिच्छा व्यक्त केल्यात.