
आशाताई बच्छाव
तलवार बाळगणारा जेरबंद ; भिंगार पोलिसांची कारवाई. अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
नगर-सोलापूर रस्त्यावर तलवार बाळगणाऱ्या तरुणास भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल भारतसिंग परदेशी (वय ३५, रा. वाघमाळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना मिळालेल्या माहितीनुसार नगर-सोलापूर रस्त्यावर एक युवक तलवार घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस गजेंद्र इंगळे, अंमलदार दीपक शिंदे, रवी टकले, संदीप घोडके, नंदकुमार पटारे, प्रमोद लहारे कैलास शिरसाठ यांच्या पथकाने केली.