
आशाताई बच्छाव
100 दिवसांच्या उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी मुदखेड तहसिल कार्यालयास दिली भेट
विविध कामाचा घेतला आढावा
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड :- राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जिल्ह्यातील विविध कार्यालयांना भेटी देत असून नुकतीच त्यांनी तहसिल कार्यालय, मुदखेड येथे भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी तहसील कार्यालय मुदखेड अंतर्गत सातबारा वरील नावाची दुरुस्ती करून दुरुस्त केलेले सातबारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या संकल्पनेतून गोबरा तांडा, तोरणा तांडा आणि वरदडा तांडा येथील नागरिकांना जातीचे दाखले आणि ऑनलाईन राशन कार्ड यांचे त्यांच्या यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
मिशन 100 डेज अंतर्गत विविध उपक्रमाची माहिती यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली तसेच तहसील कार्यालय मुदखेड येथे करण्यात आलेल्या विविध कार्यालयीन सुधारणांचा आढावा त्यांनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी पठाण यांनी केले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी भोकर प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार आनंद देऊळगावकर, नायब तहसीलदार विजयकुमार पाटे तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी , मंडळ अधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.