
आशाताई बच्छाव
माहोरा येथे विरोधी पक्ष नेते अंबादास जी दानवे साहेब यांचे स्वागत
जाफराबाद प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 28/03/2025
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे श्री अंबादास जी दानवे विदर्भ दौऱ्यावर असताना माहोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबले असता त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.त्यानंतरच श्री अंबादास जी दानवे साहेब यांचे श्री सुरेश बोरसे (बजरंग) यांनी त्यांचे शाल आणि पुष्प हार देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थित जेष्ठ शिवसेना कार्यकर्ते श्री बाळासाहेब देशमुख पिंपळगांव ( रे), जलिंधत बुधवत बुलढाणा आणि भास्कर जाधव,रामदास कदम, कृष्णा पोफळे, राजू गौरकर, बाळू जाधव,राजू बोराडे, विमोचन बोरसे हे उपस्थित होते.