
आशाताई बच्छाव
माहोरा नगरीत रेणुका माता कृपेने अखंड हरिनाम सप्ताह भावार्थ रामायण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
जाफराबाद प्रतिनीधी- मुरलीधर डहाके
दिनांक 27/03/2025
माहोरा ता.जाफराबाद येथे रेणुका माता कृपेने अखंड हरिनाम सप्ताह भावार्थ रामायण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र शु.९ शके १९४७ रोज रविवार दि.०६/०४/२०२५ ला अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ होणार आहे. भावार्थ रामायण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण साठी रामायणाचार्य ह.भ.प.श्री शाम महाराज बोर्डे असणार आहे.
दैनंदिन कार्यक्रम सकाळी ४ ते ६ काकडा ८ ते १० ज्ञानेश्वरी पारायण दुपारी २ ते ४ भावार्थ रामायण सायंकाळी ६ ते ८ हरिपाठ रात्री ८.३०ते १०.३० वाजता हरी किर्तन असा दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.
१)तसेच दि.०६/०४/२०२५ रोज रविवार ह. भ.प.श्री रवींद्र महाराज महाले यांचे ८.३० ते १०.३०वाजेपर्यंत हरिकिर्तन होणार आहे.
२)०७/०४/२०२५ रोज सोमावर ह.भ.प.अनिताताई पवार यांचे हरिकिर्तान यांचे ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत हरी किर्तन होणार आहे.
३) दि.०८/०४/२०२५ रोज मंगळवार या दिवशी श्री विष्णू महाराज सास्ते यांचे रात्री ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत हरी कीर्तन होणार आहे.
४) दि.०९/०४/२०२५ रोज बुधवार या दिवशी झगरे गुरुजी यांचे हरी कीर्तन होणार आहे.
५) दि. १०/०४/२०२५ वार गुरूवार या दिवशी ज्ञानेश्र्वर माऊली महाराज (शेलुदकर ) यांचे रात्री ८ .३० ते १०.३० वाजेपर्यंत हरी किर्तन होणार आहे.
६) दि.११/०४/२०२५ रोज शुक्रवार ह.भ.प. श्री नीलेश महाराज भुंबरे यांचे रात्री ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत हरी कीर्तन होणार आहे.
७) दि.१२/०४/२०२५ रोज शनिवार यादिवशी ह भ.प.श्री अजेबराव महाराज मिरगे यांचे ८.३० ते १०.३०वाजेपर्यंत हरी किर्तन होणार आहे.
८) दि.१३/०४/२०२५ रोज रविवार यादिवशी श्री शाम महाराज बोर्डे यांचे रात्री ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत हरी कीर्तन होणार आहे.
तसेच गायनाचार्य – ह.भ. प.भागवत लोखंडे , ह.भ. प. विठ्ठल कापसे, ह.भ.प.बालाजी उबाळे, ह.भ.प.आनंद अंभोरे,
मृदुंगाचार्य – ह.भ.प. ऋषिकेश देशमुख
विणकरी – दत्तू शेवणकर, नानाभट्ट जाधव, हरिदास राऊत, उत्तमराव कळम
चौपदार – सुभाषराव शहागडकर, किसनराव कासोद
कार्यक्रमाची सांगता चैत्र कृ.१ शके १९४७ रोज रविवार १३/०४/२०२५ या दिवशी महाप्रसादाने होणार आहे.
अशा प्रकारे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक ह.भ.प.पद्माकर वाघ आणि माहोरा येथील गावकरी मंडळी यांनी दिली आहे.