
आशाताई बच्छाव
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील शिवराम/टोला येथील घटना
संजीव भांबोरे
गोंदिया –जिल्ह्याच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या शिवराम/टोला गावात आज दि.23 मार्च रोजी रविवार ला सकाळी 8:00 वाजेच्या सुमारास कक्ष क्रमांक 332 जंगल परिसरात मोहफूल वेचायला गेलेल्या महिलेवर दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला चढविला या हल्यात महिलेचा मृत्यू झाला.अनुसया धानु कोल्हे वय 45 वर्षे असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.तर या हल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर वाघाने तब्बल तीन तास त्या महिलेच्या मृतदेहा जवळ ठाम बसुन होता.या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आणि वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.तर गावकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात एकच गर्दी केली होती.महिलेचा मृतदेह वन विभागाने ताब्यात घेतले असून शवविच्छेदन करण्यासाठी केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे.तर वन विभागाने परिसरातील लोकांना जंगलात एकटे जाणे टाळावे असे आव्हान केले आहे.तर वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करुन मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.