आशाताई बच्छाव
ह्युमन राइट्स संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ : ह्युमन राइट्स संरक्षण संस्था मुंबई (स्पेशल कन्सल्टिटेटिव्ह स्टेटस फॉर युनायटेड नेशन्स) या प्रतिष्ठित फोरमच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्ती राज्याध्यक्ष राकेश सिंह यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
गजानन वाळके पाटील यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल समाजातील शेवटच्या घटकापर्यंतच्या व्यक्तीचे हक्क आणि अधिकार अबाधित राहण्यासाठी आणि कायद्याचे संरक्षण देण्यासाठी तसेच संविधानाचे संरक्षण करण्यासाठी सदरील नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल गजानन पाटील वाळके यांचे माजी राज्यमंत्री तथा आ. अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे, भाजपाचे जालना विधानसभा प्रमुख भास्करराव दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, तुळशीराम पाटील शेळके, सहदेव अंभोरे, अर्जुन उढाण, गजानन अंभोरे, शिवाजी अंभोरे, नामदेव अंभोरे, गौरव नवगिरे, विजय गाडेकर, राकेश खैरनार, राजेश भिसे, पांडुरंग खराबे, शरद वाबळे, अनिकेत वाळके, बबनराव बोरुडे, पांडुरंग देशमुख, तुकाराम मालुसरे, कृष्णा मालुसरे, सचिन जाधव, प्रमोद आरसूड यांनी स्वागत केले आहे.