आशाताई बच्छाव
डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार
बदनापूर,/जालना दि. २४(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित
शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार२०२५ विविध क्षेत्रात काम करणार्या
कर्तबगार व्यक्तीचा मानाचा समजला जाणार राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव
करण्यात येतो.
आरोग्य क्षेत्रात विशेषतः बदनापूर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर हे
करत असलेल्या कार्याबद्दल त्याना राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर
झाला आहे. हा पुरस्कार शनिवार २९ मार्च रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
नाट्यमंदिर, सिन्नर, ता. सिन्नर जि. नाशिक येथे विधान परिषदेचे विद्यमान
सभापती ङनामदार प्रा.राम शिंदे व इतर मान्यवराच्या उपस्थितीत प्रदान
करण्यात येणार आहे.
०००००००००