आशाताई बच्छाव
संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर
दर्गा ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा (353) उरुस साजरा
जालना,(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-मराठवाडा ही संताची भूमी आहे. या भूमीच्या संतानी नेहमी समतेचा आणि शांतीचा संदेश दिला आहे. खर्या अर्थानं तो जपण्याची वेळ येवून ठेपली आहे असे प्रतिपादन आमदार अर्जुनराव खोतकर यांनी ह.दर्गा जानुल्लाह शाह (बाबा) यांच्या 353 व्या उरुस निमित्त शनिवारी रोजी आयोजित कार्यक्रमात केले.
ह. दर्गा जानुल्लाह शाह (बाबा) खुदाम व्यवस्थापन समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही (353) वा उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. खोतकर बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण, जेष्ठनेते इकबालपाशा शहर जिल्हा काँँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, राज्य हज कमिटीचे फेरोजलाला तांबोळी, शिवसेना (उबाठा) चे शहर प्रमुख बाला परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, शिवसेना (एकनाथ शिंदे) शहरप्रमुख विष्णु पाचफुले, माजी गटनेते गणेश राऊत, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मिर्जा अनवर, वसंत जाधव, अॅड महेश धन्नावत आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून व्यवस्थापन समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना श्री खोतकर म्हणाले की, ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा गौरवशाली इतिहास असून त्यांनी आपले जीवन समाजाच्या कल्याणासाठी आणि माणुसकीचा धर्म जोपासण्यासाठी व्यतीत करून समतेची शिकवण समाजात रुजविली आज याठिकाणी सर्व जातीधर्माचे लोक एकवटलेले आहे.