Home जालना जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी प्रा. व माध्यमिक आश्रम माहोरा...

जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी प्रा. व माध्यमिक आश्रम माहोरा शाळेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक

25
0

आशाताई बच्छाव

1001350992.jpg

जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी प्रा. व माध्यमिक आश्रम माहोरा शाळेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक

जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 25/03/2025

माहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्रा. व माध्यमिक आश्रम शाळा, यांनी दिनांक 22 आणि 23 मार्च रोजी जालना भारत स्काऊट गाईड कार्यालय तथा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्या मध्ये सहभाग नोंदवून वेगवेगळ्या स्पर्धे मध्ये विविध पारितोषिक जिंकून शाळेचा नाव लौकिक वाढविला. हा मेळावा दिनांक 22 आणि 23 मार्च रोजी जि. प. प्रशाला मुलांची, स्टेशन रोड जालना येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शाळेने बँड वादन स्पर्धे मध्ये द्वितीय तर पथ संचलन स्काऊट(मुले )आणि गाईड (मुली) दोन्ही संघांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.तसेच शोभा यात्रे मध्ये सर्व महापुरुषांचे देखावे सादर करुन तृतीय क्रमांक मिळविला. समारोप तसेच पारितोषिक वितरणासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार मा. कैलास जी गोरंट्याल, तसेच गटशिक्षणाधिकारी भरत वानखेडे साहेब, जालना हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. प्रदीप हुशे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले,स्पर्धे मध्ये एकूण 24 विद्यार्थी सहभागी झाले होते.सहभागी विद्यार्थ्यांचे नेतृत्व तसेच मार्गदर्शन श्री व्ही. के. चंदनशिव आणि कु अनुसया हांडगे यांनी केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. खा. श्री रावसाहेब पाटील दानवे(केंद्रीय राज्य मंत्री, भारत सरकार),संस्थेचे सचिव मा. आमदार श्री संतोष पाटील दानवे(अध्यक्ष पंचायत राज समिती म. रा.) संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री संदीप साबळे ,शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. एल. सिनगारे तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच शुभेच्छा दिल्या.

Previous articleजालना येथे झालेला चर्मकार समाज मेळावा. व चर्मकार समाज पुरस्कार सोहळा संपन्न
Next articleसंतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here