आशाताई बच्छाव
आदर्श विषय साधन व्यक्ती पुरस्काराबद्दल डायट येथे श्री प्रफुल राजे यांचा सत्कार
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक २४/०३/२०२५
जालना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये यावेळेस विषय साधन व्यक्ती यांना आदर्श विषय साधन व्यक्ती पुरस्कार जालना गटसाधन केंद्र या ठिकाणी कार्यरत असलेले प्रफुल्ल राजे यांना पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. साधन व्यक्ती गटातील हा पहिलाच पुरस्कार असल्याने सर्वसाधारण व्यक्तींमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे या पुरस्काराबद्दल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने प्रफुल राजे यांचा सत्कार वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ प्रमोद कुमावत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अधिव्याख्याता सय्यद अख्तर, साधन व्यक्ती छगन जाधव, संतोष गिर्हे, रवींद्र कदम, मनीषा गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रफुल्ल राजे हे साधन व्यक्ती म्हणून कार्यरत होण्यापूर्वी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. गटसाधन गट साधन केंद्र जालना येथे 25% आरटीईचे प्रवेश विविध प्रशिक्षणे, शाळांना भेटी करून त्यांना मार्गदर्शन अशा विविध प्रकारचे उत्कृष्ट कार्य ते करीत आहे या कार्याचे दखल घेऊन त्यांचा सन्मान शिक्षक परिषदेचे वतीने करण्यात आला. या प्रसंगी श्रीमती निलोफर पटेल श्रीमती प्रेरणा मोरे डॉ. श्रीहरी दराडे, श्री भारत सूर्यवंशी आदी डायटमधील सर्व स्टाफ उपस्थित होता.