Home बुलढाणा अंढेरा पोलीस स्टेशन मधील कर्मचारी भागवत गिरी यांचा मृत्यू तर रामेश्वर आंधळे...

अंढेरा पोलीस स्टेशन मधील कर्मचारी भागवत गिरी यांचा मृत्यू तर रामेश्वर आंधळे गंभीर जखमी अवैद्य धंद्याचे वाढते प्रमाण पोलीस खात्यात खळबळ पोलिस निरीक्षक रुपेश शक्करगे साहेब लक्ष देणार का?

28
0

आशाताई बच्छाव

1001350931.jpg

अंढेरा पोलीस स्टेशन मधील कर्मचारी भागवत गिरी यांचा मृत्यू तर रामेश्वर आंधळे गंभीर जखमी अवैद्य धंद्याचे वाढते प्रमाण पोलीस खात्यात खळबळ पोलिस निरीक्षक रुपेश शक्करगे साहेब लक्ष देणार का?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-चिखली चिखली तालुक्यातील मौजे मिसाळवाडी ते शेळगाव आटोळ येथे दिनांक 23 मार्च 2025 रोजी अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी रामेश्वर आंधळे व भागवत गिरी हे MH28 H 1609 या मोटरसायकल ने आपल्या बिट मध्ये 2 वाजता जात असताना त्यांना अवैध दारूचे बॉक्स दिसले त्यांनी अवैध्य दारूचे बॉक्सच्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता अवैध दारूच्या वाहतूक करणार अज्ञात व्यक्तीने रामेश्वर आंधळे यांच्या गाडीला MH28AY 1609 या गाडीला लात मारल्याने अंढेरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी भागवत गिरी व रामेश्वर आंधळे गाडी सह रोडच्या खाली गेल्यामुळे सदर गाडी झाडाला धडकल्यामुळे जबर धडक दिल्यामुळे भगवत गीर यांचा जागीच मृत्यू झाला
आहे तर रामेश्वर आंधळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना चिखली येथे उपचारासाठी नेण्यात आले असल्याचे माहिती समोर आली आहे सदर माहिती अंढेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे व अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जारवल साहेब व त्यांच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळतच त्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे सदर बातमी ही पोलीस खात्यामध्ये वाऱ्यासारखे पसरताच देउळगाव राज्याच्या एसडीपीओ मॅडम मनीषा कदम यांनी सुद्धा घटनास्थळी येऊन चिखली येथे भरती केलेले पोलीस कर्मचारी रामेश्वर आंधळे यांचे भेट घेतली आहे अवैध धंद्याचा बरेच दिवसापासून कळस झाला आहे परंतु नव्यानेच रुजू झालेले अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हा शाखा बुलढाणा चे पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे यांनी आपल्या तपासाचे प्रगती वाढवल्यामुळेच अवैध धंदेवाल दस्तवले असल्यामुळे असे कृत्य करत असल्याचे परिसरामध्ये चर्चा होत आहे अंढेरा पोलीस स्टेशनचे एका कर्मचाऱ्याचा या मध्ये जीव गेला आहे आता अंढेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे काय भूमिका घेतात त्याच्याकडे सुद्धा सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे.

Previous articleदोन ‘आगलावे’ वनविभागाच्या जाळ्यात ! – गिरडा जंगल क्षेत्रात लावत होते आग ! – सुनावली एक दिवसाची वन कोठडी!
Next articleआदर्श विषय साधन व्यक्ती पुरस्काराबद्दल डायट येथे श्री प्रफुल राजे यांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here