Home बुलढाणा दोन ‘आगलावे’ वनविभागाच्या जाळ्यात ! – गिरडा जंगल क्षेत्रात लावत होते आग...

दोन ‘आगलावे’ वनविभागाच्या जाळ्यात ! – गिरडा जंगल क्षेत्रात लावत होते आग ! – सुनावली एक दिवसाची वन कोठडी!

31
0

आशाताई बच्छाव

1001350911.jpg

दोन ‘आगलावे’ वनविभागाच्या जाळ्यात ! – गिरडा जंगल क्षेत्रात लावत होते आग ! – सुनावली एक दिवसाची वन कोठडी!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा गिरडा (1) बीट राखीव जंगल क्षेत्रात आग लावताना दोन आरोपींना वनविभागाच्या पथकाने कारवाई करत रंगेहाथ पकडले आहे. आरोपीवर भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आले असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी ए.एन. ठाकरे यांनी दिली.
वन विभागाच्या कारवाईमध्ये आरोपी रतन मनोहर राठोड (वय 60 वर्षे, रा. पळनये नाईक, बुलडाणा) व रामेश्वर श्रीचंद राठोड (वय 32 वर्षे, रा. हनवतखेड, ता. मोताळा, जि. बुलडाणा) यांना अटक करण्यात आली. या आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (बी, सी, डी, ई), 52, 61, 65अ तसेच सार्वजनिक हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 4 अंतर्गत गुन्हा (क्रमांक-15839/01) दाखल करण्यात आले. तसेच दोन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायालय, बुलडाणा येथे हजर करण्यात आले असता, त्यांना एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली. कायद्यानुसार, अशा गुन्ह्यांसाठी 1 ते 10 वर्षे शिक्षेची तरतूद आहे. सदर कारवाई विभागीय वन अधिकारी दक्षता तथा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, उपवनसंरक्षक सरोज गवस व सहाय्यक वनसंरक्षक आश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) ए. एन. ठाकरे, वनरक्षक गिरडा बीटचे प्रदीप प्रकाश मुंढे, वनरक्षक व्ही. जी.राऊत, बी. ए. घुले, वाहन चालक संदीप मडावी, रविंद्र तायडे, दीपक सोनुने, अरुण पंडित, अमोल चव्हाण, जितेंद्र सोनुने सहभागी होते. तसेच प्रकरणाचा पुढील तपास वनपाल एस. डी. वानखडे करतील.
• नागरिकांनी जंगलात आग लावू नये!
जंगलात आग लावू नये! हा मोठा वन गुन्हा आहे. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल, असे आवाहन वन विभागाव्दारे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here