आशाताई बच्छाव
दिव्यांग वृध्द निराधारांचा बिलोली येथील मेळाव्यास मोठा प्रतिसाद.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
बिलोली :
बिलोली पंचायत समिती सभागृहात दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग, वृध्द निराधारांच्या हक्कांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास विविध प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत खेडोपाड्यातून आलेल्या दिव्यांग, वृध्द, निराधार बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला.
प्रमुख वक्ते म्हणून गोविंदराव मुंडकर, जेष्ठ पत्रकार माधवराव अटकोरे (अर्पण अवयवदान समिती नांदेडचे संस्थापक अध्यक्ष), सहपोलिस निरीक्षक स्वामी सर, आगार व्यवस्थापक नरसिंग निमलवाड, संपादक कमलाकर जमदाडे, शहाजी वरखिंडे, आरिफ शेख, मुस्ताफा पिंजारी, रामप्रसाद चनावार व इतर मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन व सत्कार समारंभ पार पडला.
डाकोरे यांनी सांगितले की, शासन-प्रशासनाच्या माध्यमातून अनेक निवेदनं व आंदोलनं करून अनेक सवलती मिळाल्या आहेत. मात्र, अजूनही न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन संघर्ष करावा, असे आवाहन त्यांनी केले. गोविंदराव मुंडकर यांनी सांगितले की, दिव्यांग व वृध्द बांधवांनी डाकोरे यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा.
सहपोलिस निरीक्षक स्वामी सर यांनी दिव्यांग कायदा २०१६ अंतर्गत कलम ९२ च्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच आगार व्यवस्थापक नरसिंग निमलवाड यांनी बस प्रवासात दिव्यांगांसाठी आरक्षित जागा योग्यप्रकारे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
माधवराव अटकोरे यांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले व मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे आवाहन केले. कमलाकर जमदाडे यांनी अंधश्रद्धा व फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचा समारोप चंपतराव डाकोरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. त्यांनी सर्वांना हक्कांसाठी संघटितपणे संघर्ष करण्याचे आवाहन केले.
मेळाव्यास आलेल्या सर्व दिव्यांग वृध्द निराधार बांधवांना नाष्ठा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
प्रसिद्धी पत्रक : दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र ता.अध्यक्ष बालाजी होनपारखे व सचिव शंकर म्हैत्रे यांनी दिले.