आशाताई बच्छाव
निमगाव येथे पत्रकार संजीव भांबोरे यांनी हरिभक्त परायण गुरुवर्य ओमदेव महाराज चौधरी यांच्याशी प्रत्यक्ष भेट करून विविध विषयावर केली चर्चा
संजीव भांबोरे
भंडारा –तालुक्यातील पहेला येथून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव येथील योग महाराज गुरुकुल दत्त मंदिर निमगाव येथे पत्रकार तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी आज दिनांक 23 मार्च 2025 ला सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष भेट देऊन हरिभक्त परायण गुरुवर्य ओम देव महाराज चौधरी यांच्याशी तेथे सुरू असलेल्या सतगुरु जोग महाराज वारकरी बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था व योग महाराज गुरुकुल दत्त मंदिर या संस्थेचे संस्थापक ओमदेव महाराज यांच्याशी विविध विषयावर पत्रकार संजीव भांबोरे यांनी चर्चा करून जोग महाराज गुरुकुल बाबत माहिती जाणून घेतली .यावेळी पत्रकार संजीव भांबोरे यांनी ओमदेव महाराज चौधरी यांच्याशी चर्चा करताना गुरुकलाची स्थापना करण्याच्या उद्देश, गुरुकुलाची व्यवस्था कशा प्रकारे ,येथे कोण कोणते उपक्रम राबविले जातात, व उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या लागल्या नंतर त्याबाबत आपलं काय प्रयोजन आहे अशा विविध प्रश्न उपस्थित करून खेळीमेळीच्या वातावरणात ओमदेव महाराज यांनी वरील प्रश्नावर योग्य उत्तरे देऊन पत्रकारांचे समाधान व्यक्त केले. या संस्थेत एकूण 37 विद्यार्थी असून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याकरिता सामाजिक कार्यकर्ते संजय एकापुरे यांनी आपली जमीन या उपक्रमाकरिता दान दिलेली आहे.