आशाताई बच्छाव
संत रामपाल जी महाराज यांचा सत्संग समारोह संपन्न.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड: 23-03-2025 रोज रविवारी नांदेड जिल्ह्यात संत रामपाल जी महाराज यांचा सत्संग कार्यक्रम घेण्यात आला. या सत्संगाचे प्रक्षेपण प्रोजेक्टर च्या माध्यमातून करण्यात आले होते. ह्या अमृतमय सत्संगामध्ये गावातील अनेक प्रभू प्रेमी व्यक्तीनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सत्संगमध्ये संत रामपाल जी महाराज यांनी सांगितले की फक्त मनुष्य (स्त्री, पुरुष) जन्मातःच परमात्मा प्राप्ती करू शकतो. सध्याच्या युगात (कलयुगात) कोणत्याही व्यक्तीला जर हे तत्त्वज्ञान सांगुण आपण त्यांना प्रार्थना केली की परमात्मा प्राप्ती साठी आपल्या दैनदिन कार्यातून थोडा वेळ द्यायला हवे तर याबद्दल सत्संगामध्ये समजावून सांगितले. जसे एक साधक सत्संगात जाऊ लागला, अनुग्रह घेतला आणि ज्ञान ऐकून भक्ति करू लागला. आपल्या मित्राला सुद्धा त्याने सत्संगात येण्याची आणि भक्ती करण्याची विनंती केली. परंतु मित्राने ऐकले नाही. म्हणाला कामामुळे फुरसत नाही आहे. छोटी छोटी मुले आहेत. त्यांचे पालन-पोषण सुद्धा करायचे आहे. काम सोडून सत्संगात जाऊ लागलो तर सारा धंदा मार खाईल. हा सत्संगात जाणारा भक्त जेंव्हा जेंव्हा सत्संगात येण्यासाठी आपल्या मित्राला म्हणायचा, तेव्हा तो हेच सांगायचा आता कामामुळे फुरसत नाही आहे. एक वर्षानंतर त्या मित्राचा मृत्यु झाला. त्याचे पार्थिव लोक आणि उचलून कुटुंबातील नगरवासी गेले. सोबत गावाच्या गल्ल्यांमधील शेकड़ों व्यक्ति सुद्धा बरोबर चालत होते. सर्व जण राम नाम सत् आहे, सत् बोले गत् आहे असे म्हणत होते. भक्त म्हणत होता राम नाम तो सत् आहे परंतु आज बंधूला फुर्सत आहे. नगरवासी म्हणत होते सत् बोले गत् आहे, भक्त म्हणत होता आज बंधूला फुर्सत आहे. अन्य लोक त्या भक्ताला सांगू लागले असे म्हणू नको, त्याच्या घरातील लोकांना वाईट वाटेल. भक्त म्हटला मी तर असेच म्हणणार. मी ह्या मूर्खाला हात जोडून विनंती करीत होतो की सत्संगात चल, काही भक्ति कर. हा म्हणायचा आता फुर्सत म्हणजेच रिकामा वेळ नाही आहे. आज ह्याला कायमची फुर्सत आहे. ज्यांच्या पालन पोषणाचा बहाणा करून परमात्म्यापासून लांब राहिला त्या छोट्या-छोट्या मुलांना सुद्धा सोडून चालला आहे. भक्ति करत असता तर रिकाम्या हाताने तरी गेला नसता. काही भक्ति धन घेऊन गेला असता, तर मुलांचे पालन-पोषण परमात्मा करत असतो. भक्ति करण्याने साधकाचे आयुष्य सुद्धा परमात्मा वाढवतो. भक्तजन असा विचार करूनच भक्ति करतात आणि काम सोडून सत्संगात श्रवण करायला जातात. भक्त विचार करतात की परमात्मा आमचा मृत्यु लवकर न आणो. मग आमची कामे कोण करणार? आम्ही असे समजून चालतो की आमचा मृत्यू झाला. आम्ही तीन दिवस मृत्यू पावलो असा विचार करून सत्संगात जातो. स्वतःला मृत मानून सत्संगात जाणे तसे तर त्या परमात्म्याच्या भक्तांचे काम कधीच बिघड़त नाही, तरीही प्रत्यक्षात आम्ही असे समजून चालतो की आमच्या गैर-हजेरीत काही काम खराब झाल्यास तीन दिवसांनी जाऊन ते ठीकठाक करू, पण प्रत्यक्षात जर वरचे टिकीट कटले असल्यास म्हणजेच मृत्यु झाल्यास काम कायमस्वरूपी बिघडते. मग पुन्हा ते ठीक करण्यासाठी आपण येउच शकत नाही. अशा स्थितीला जिवंतपणी मरणे म्हणतात. जसे द्वादश मध्य महल मठ बौरे, बहुर न देहि धरै रे। सरलार्थ :- श्रीमद् भगवत गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये म्हटले आहे की तत्वज्ञानाच्या प्राप्ति नंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे एकदा पोहोचल्यानंतर साधक ह्या मृत्युलोकात परत येत नाहीत म्हणजेच त्यांचा पुनर्जन्म होत नाही. ते पुन्हा देह धारण करीत नाहीत. दोजख बहिश्त सभी तै देखे, राजपाट के रसिया। तीन लोक से तृप्त नाहीं, यह मन भोगी खसिया ॥ सरलार्थ तत्वज्ञानाचा अभाव असल्याने पूर्णमोक्षाचा मार्ग न मिळाल्याने कधी कधी दोजख म्हणजेच नरकात गेले, कधी बहिश्त म्हणजेच स्वर्गात गेले कधी राजा होऊन आनन्द घेतला. ह्या मनुष्याला तीनही लोकाचे राज्य जरी दिले तरीही त्याची कधीही तृप्ति होणार नाहीं. भक्त समाजास आमचे येवढेच निवेदन आहे की संत रामपाल जी महाराजांच्या तत्वज्ञानाला समजून आपले मानव जन्म सफल करावे.