आशाताई बच्छाव
दूरसंचार सल्लागार समितीची बैठक संपन्न – BSNL सेवांसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ- औरंगाबाद आणि बुलढाणा जिल्ह्यांची दूरसंचार सल्लागार समिती बैठक पार पडली. या बैठकीत BSNL च्या सेवांबाबत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. BSNL नेटवर्कची सद्यस्थिती, टॉवर उभारणी, टेंडर प्रक्रियेत झालेल्या त्रुटी आणि नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क (NOFN) योजनेअंतर्गत झालेल्या कामांची पडताळणी यावर भर देण्यात आला.
बैठकीत मागील TAC मिटिंग (फेब्रुवारी 2024) च्या इतिवृत्ताची प्रत मागविण्यात आली, तसेच BSNL च्या कामकाजात आलेल्या अडचणींवर चर्चा झाली. ठेकेदाराने औरंगाबाद, जालना आणि बुलढाणा येथे तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या कामांसाठी EPF, ESIC आणि इतर कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्यामुळे BSNL ने बील थांबविले होते. परंतु नियमांचे उल्लंघन करत गुत्तेदारास चुकीच्या पद्धतीने बीले अदा करण्यांत आले. या संदर्भात तीन दिवसांत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश खा.डॉ.कल्याण काळे यांनी दिले.
तसेच, औरंगाबाद बीए अंतर्गत OFC टाकणे व दुरुस्तीवरील खर्चाची तपासणी करण्यास सांगण्यात आले. मागील तीन वर्षांत लॉसी फायबर, रिहॅबिलिटेशन आणि नवीन केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. जालन्यात NOFN प्रकल्पांतर्गत 139 कोटी रुपये खर्च झाले, परंतु प्रत्यक्षात ही सेवा कार्यरत नाही. सध्या देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली फक्त बिलिंग केली जात आहे.
बैठकीत BSNL च्या नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क (NOFN) योजनेवर सुद्धा चर्चा झाली. हा प्रकल्प देशातील 2,50,000 ग्रामपंचायतींना फायबर नेटवर्कने जोडण्यासाठी तयार करण्यात आला होता. तसेच 1 एप्रिल 2023 पासून मेंटेनन्ससाठी 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, सध्या नेटवर्क कार्यरत नाही, त्यामुळे हा खर्च अनुत्पादक ठरला आहे.