आशाताई बच्छाव
अनिकेतच्या मारेकऱ्यांना 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी.
वाशिम : (गोपाल तिवारी)
वाशिम जिल्ह्यातील व अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाबुळगाव येथील अनिकेत संतोष सादुडे (वय 14 वर्ष) या बालकाचे 12 मार्च रोजी रात्री बारा वाजता लग्न समारंभातून अपहरण करून त्याचं रात्री त्याचा गळा आवळून खून करण्यात आला.
पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही पाहिजे म्हणून अपहरण नाट्य घडवून आणून अनिकेतच्या सुटकेसाठी 60 लाखाची खंडणी मागितली असे आरोपीने कबूल केले.
21 मार्च 2025 रोजी हे अपहरण व हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी प्रणव पद्माने (वय वीस वर्ष) व शुभम इंगळे (वय वीस वर्ष) या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आज न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने 29 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
21 मार्च रोजी वाशिम पुसद मार्गावर अनिकेतचा मृतदेह सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. अल्पवयीन अनिकेत याचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. 12 मार्चला हे अपहरणाचे प्रकरण घडले आणि त्यानंतर पोलिसांना अनिकेतच्या शोधासाठी तपासाची चक्रे गतिमान करत शोध सुरू केला मात्र तरीही अनिकेतचा थांगपत्ता न लागल्याने अनिकेतच्या पालकांना मोठी चिंता लागली होती. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बारा पोलीस पथक शोधकार्यासाठी लावले होते. अखेर दहाव्या दिवशी अनिकेतचा मृतदेह सापडल्याने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने 29 मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे.
सदर घटनेचा तपास अनसिंग पोलीस स्टेशनचे फौजदार करत आहेत.