आशाताई बच्छाव
अजितबाबा चौकातील सभागृहात समता सैनिक दलाचा स्थापना दिवस साजरा
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)साकोली येथील अजित बाबा चौक येथील पंचशील बौद्ध विहाराच्या पटांगणात समता सैनिक दलाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय टॉप ऑफिसर गजेंद्र गजभिये होते तर उद्घाटक म्हणून समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे होते. प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जि ओ सी आर सी फुलोके, शि डी गवरे, भंडारा कमांडर कैलास गेडाम, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी, दीपक मेश्राम, समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष चिरंजीव बारसागडे अजित बाबा चौकाचे समता सैनिक दलाचे प्रमुख प्रमिला टेंभूर्कर ,तालुका उपप्रमुख ज्योति शहारे , बादशहा मेश्राम, प्रबोधनकार मनोज कोटांगले, भावेश कोठांगले ,शब्बीर पठाण प्रज्ञा दिरबुडे,स्वप्निल गजभिये, स्वप्निल गणवीर, आशा खोब्रागडे, कविता राऊत ,कविता जांभुळकर, गुलाब नंदेशश्वर, छाया रंगारी, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत आपला दिवस संपन्न झाला सर्वप्रथम स्वागत गीत झालं तेथे स्थापना दिनानिमित्त अजित बाबा चौकात पंचशील बौद्ध विहार जवळ महिलांनी समता सैनिक दलाची शाखा ओपन केली या शाखेचा पण उद्घाटन करण्यात आले .निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर सर्व मान्यवरांचे भाषण झाले त्यामध्ये समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी एफ कोचे यांनी सांगितले की समता सैनिक दल हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली व स्वतःच्या समाजाची संरक्षणाची जबाबदारी या दलावर दिलेली आहे.
जर आपल्या समाजावर जर कोणी अन्याय अत्याचार केला तर त्याला प्रतिकार म्हणून आपला समता सैनिक दल जाऊन जाईल व प्रतिकार करेल व आपल्या समाजावर होणारा अन्याय दूर करण्याची जबाबदारी समता सैनिक दलावर ठेवलेली आहे त्याचप्रमाणे ठिकठिकाणी ज्या मोठे सभा होतात त्या ठिकाणी सर्वांनी शिस्तबद्ध राहावे व पोलीस प्रशासना सोबतच समता सैनिक दलाच्या प्रशासन डिसिप्लिन शिस्त लावण्याकरता त्या ठिकाणी तैनात करण्यात येतो या संस्थेच्या माध्यमातून डॉ बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचारांनी प्रसार करण्यात येतो. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे विचार आचरणात कसे आणता येईल या दृष्टिकोनातूनही तसे कार्यकर्ते समता सैनिक दलाचे सैनिक तयार केले जातात असे मत मांडले .
राष्ट्रीय स्टॉप ऑफिसर गजेंद्र गजभिये,भंडारा जिओ शी आर सी फुललुके, सी डी गवरे ,भंडारा कमांडर कैलास गेडाम, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी , दीपक मेश्राम, कल्पना सांगोळे, शब्बीर पठाण, इत्यादी मान्यवरांची भाषणे झालीत त्यांच्या भाषणातून बाबासाहेबांचा विचार कसा अमलात आणला जाईल याविषयी जोर देण्यात आला व समता सैनिक विद्यालयाच्या माध्यमातून अन्याय कसा दूर केला जाईल याविषयी सुद्धा मत मांडण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक तालुका अध्यक्ष चिरंजीव बारसगडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पद्ममा मडामे , प्रमिला टेंभुर्कर, हेमलता जनबंधू ,अरुणा बडोले, शालू कोटांगले, उत्तम गड- पायले, स्वर्णमाला गजभिये, यशोधरा रामटेके, छबिला नंदेश्वर, वर्षाताई मेश्राम, विद्या काणेकर, शकुंतला घोडेस्वार लेसना राउत,सुरेखा उंदीरवाडे राजश्री टेंभुर्कर ,स्वाती मेश्राम, चंद्रकला जांभुळकर ,पंचशीला गेडाम भूमिका, साखरे, रंजना राऊत नेहा राऊत व इतरही समता सैनिक दलाच्या सैनिकांनी खूप मेहनत घेतली.