आशाताई बच्छाव
ग्रामपंचायत एकोडीच्या वतीने जागतिक जल दिन साजरा
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)जलजीवन मिशन अंतर्गत २२ मार्च २०२५ रोजी ग्रामपंचायत एकोडीच्या वतीने जागतिक जल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद हायस्कूल एकोडीच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थींनी यांची रॅली काढण्यात आली.त्यामध्ये ‘थेंब थेंब वाचवू पाणी, आनंद येईल आपल्या जीवनी’, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘पाण्याचे संरक्षण, धरतीचे रक्षण’, ‘पाण्याची बचत, काळाची गरज’, ‘प्रत्येकाचा एकच नारा, पाण्याची काटकसर करा’ असे नारे देण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी जल प्रतिज्ञा घेण्यात आली.
याप्रसंगी एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, ग्रामपंचायत अधिकारी गौतम खंडाळे, पाणी आणि स्वछता समन्वयक निरंजन गणवीर, मुख्याध्यापक विलास लांजेवार , निकेत खेडीकर, सुधाकर ढोणे, निलेश चोले, संध्या साखरे, संगीता कुटारे, विभा मेश्राम, ज्ञानेश्वर हजारे, सुषमा मारवाडे, दिलीप चौधरी, अमित भैसारे, शेषराज मेश्राम आदी उपस्थित होते. यशस्वतेसाठी सर्व ग्रा.पं.सदस्य, कर्मचारी व जि.प.हायस्कूलचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले.