आशाताई बच्छाव
खासदार कल्याण काळे खासदार संदिपान भुमरे खासदार व मंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत दूरसंचार सल्लागार समितीची बैठक संपन्न
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन जिल्हा जालना
जालना संभाजीनगर व बुलढाणा जिल्ह्यातील दूरसंचार सेवेबाबत विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. बीएसएनएल नेटवर्कची सध्याची स्थिती टावर उभारणी टेंडर प्रक्रिया झालेल्या तुरटी आणि नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क म्हणजे एन ओ एफ एन योजनेअंतर्गत झालेल्या कामाची पडताळणी यावर भर देण्यात आला बैठकीत मागील TAC मीटिंग फेब्रुवारी 2024 च्या इतिवृत्ताची प्रत मागविण्यात आली तसेच Bsnlच्या कामकाजात आलेल्या अडचणीवर चर्चा करण्यात आली ठेकेदाराने संभाजीनगर जालना आणि बुलढाणा येथे तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या कामासाठीEPFESIC आणि इतर कायदेशीर बाबीची पूर्तता न केल्यामुळे BSNL ने बिल थांबले होते परंतु नियमाचे उल्लंघन करत गुत्तेदारास चुकीच्या पद्धतीने बिले अदा करण्यात आली या संदर्भात तीन दिवसात संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश खासदार कल्याण काळे यांनी दिले तसेच औरंगाबाद बी ए अंतर्गत ओएफसी व दुरुस्तीवरील खर्चाची तपासणी करण्यास सांगण्यात आले मागील तीन वर्षात लॉसि फायवर रिहॅबिलिटेशन आणि नवीन केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला जालन्यात एनओएफएन प्रकल्पा अंतर्गत 149 कोटी रुपये खर्च झाले परंतु प्रत्यक्षात ही सेवा कार्यरत नाही सध्या देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली फक्त बिलिंग केली जात असल्याचे या बैठकीत सांगण्यात आली. बैठकीत बीएसएनएलच्या नॅशनल अॅक्टीकल फायबर नेटवर्क योजनेवर सुद्धा चर्चा झाली हा प्रकल्प देशातील दोन लाख 50 हजार ग्रामपंचायतींना फायबर नेटवर्कने जोडण्यासाठी तयार करण्यात आला होता तसेच 1 एप्रिल 2023 पासून मेंटेनन्स साठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले मात्र सध्या नेटवर्क कार्यरत नाही त्यामुळे हा खर्च अनुउत्पादक ठरला आहे या संदर्भात खालील प्रश्न उपस्थित करण्यात आले या बैठकीमध्ये जालना औरंगाबाद व बुलढाणा साठी नवीन टावरला मान्यता मिळालेली आहे सदरहून टावरचे लवकरच काम सुरू होणार आहे जालना जिल्ह्यात एनओएफएन अंतर्गत किती ग्रामपंचायत जोडल्या गेल्या प्रश्न एक त्यापैकी किती ग्रामपंचायतीमध्ये सध्या नेटवर्क सुरू आहे प्रश्न दोन प्रश्न तीन या संपूर्ण प्रकल्पासाठी झालेला एकूण खर्च किती प्रश्न चार एक एप्रिल 2023 पासून आज पर्यंत देखभाल दुरुस्तीवर झालेला खर्च आणि त्याचा उपयोग काय बैठकीत हा विषय गंभीर मानला गेला आणि बीएसएनएल अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना खासदार कल्याण काळे यांनी दिल्या महत्त्वाचे निर्णय आणि पुढील कृती योजना जे बीएसएनएल टॉवर अखंडीत सुरू राहावे यासाठी खासदार कल्याण काळे हे मंत्री महोदयाकडे विनंती करणार असल्याचे सांगितले सरकारी कार्यालयामध्ये बीएसएनएल कनेक्शन सक्तीचे करण्यासाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले bsnl च्या विविध योजनांचा आढावा ग्राहकांसाठी नवीन योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी चर्चा करण्यात आली या बैठकीला बीएसएनएल सेवेच्या बळकटीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यामुळे नेटवर्क सुधारणे ग्रामपंचायत मध्ये एनओएफएन प्रभावीपणे कार्यान्वित करणे यावर या बैठकीत चर्चा झाली .