आशाताई बच्छाव
तस्करी सातगाव मसला असो की, कुंबेफळ.. वाळूसम्राटांचे वाढतेय बळ ! रात्रंदिवस अवैध वाळू साठा व वाहतूकीला उधाण ! – वाळू तस्करी रोखण्याचे यंत्रणे समोर आव्हान!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा वाळूचा अवैधरीत्या साठा आणि वाळूची रात्रंदिवस वाहतूक करणाऱ्या वाळू सम्राटांनी महसूल यंत्रणेपुढेच आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे या गंभीर प्रकाराकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होतेय. सातगाव मसला, कुंबेफळ परिसरात अनेक वाळू माफियांचे वाळूत हात ‘काळे’ होत आहेत.
रात्रंदिवस वाळू उपसा वाळूसाठे करण्यावर वाळूसम्राटांनी जोर लावला आहे. वाळू उपसा करून ती गावात आपल्या शेतातील गोठ्यात, गायरानसह मिळेल त्या जागेवर टाकायची व नंतर वाळू वाहतूक करणाऱ्या माफीयांशी संपर्क साधून ती दररोज रात्री भरून द्यायची, असा ‘रात्रीचा खेळ’ दररोज चालत आहे. अवैध वाळू साठा व वाहतूकी विरोधात ‘महसूल’ची कारवाई मात्र दिसून येत नाही. या अवैध धंद्यात बक्कळ कमाई असल्याने अनेक जण वाहने खरेदी करून या व्यवसायात उतरले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात एकाही वाळू पट्ट्याचा लिलाव झालेला नसून हा अवैध वाळूचा धंदा नागरिकांना दिसतो मग प्रशासनास का दिसत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.